Goa News Dainik Gomantak
गोवा

पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी ५३ कोटींची तरतूद

विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली : रोहन खंवटे यांचे लेखी उत्तर

दैनिक गोमन्तक

पणजी :राज्‍यातील पर्यटन क्षेत्राच्‍या वाढीसाठी २०२१-२२ मध्ये ५३ कोटी ५४ लाख रुपयांची तरतूद केली असून, हा सर्व निधीवाटप झाला आसून.त्यापैकी 11 कोटी 66 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. तर 41 कोटी 87 लाख रुपये शिल्लक असल्‍याचे लेखी उत्तर पर्यटनमंत्री रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी सभागृहात दिले.

आमदार वेन्‍झी व्हिएगस (VENZY VIEGAS) यांनी याबाबतचा अतारांकित प्रश्‍न विचारला होता. पर्यटनाच्‍या विकासासाठी 2020-21 मध्ये 62 कोटी 68 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सर्व निधीवाटप झाले आहेत. पैकी 30 कोटी 87 लाख रुपये खर्च झाले आणि 31 कोटी 80 लाख रुपये शिल्लक राहिल्‍याचे या उत्तरात म्‍हटले आहे.कोरोनामुळे राज्‍यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली असल्‍याचे पर्यटनमंत्र्यांनी दिलेल्‍या उत्तरात म्‍हटले आहे.

2019 मध्ये राज्‍यात सुमारे 9 लाख 37 हजार 113 विदेशी नागरिक आले होते; तर 2020 मध्ये यात घट होऊन ती तब्बल 3 लाख 193 इतकी खाली आल्‍याचे लेखी उत्तरात म्‍हटले आहे. 2021 मध्ये यात आणखी घट होऊन ती 22 हजार 128 इतकी रोडावल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे. 2021 मध्ये युकेमधून ३ हजार 166 पर्यटक आले. जर्मनीमधून 656, युक्रेनमधून 91,फिनलँडमधून 91,फ्रान्‍समधून 589,इराणमधून 34,स्‍विझर्लंडमधून 89,युएईमधून 149,पोर्तुगालमधून 3,कॅनडाहून 269,अमेरिकेतून 2039,ऑस्‍टेलियामधून 122,इटलीतून 38,कझागिस्‍तानमधून 398 तर अन्‍य देशांतून 13 हजार 4 पर्यटक गोव्‍यात दाखल झाल्‍याची माहिती खंवटे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागात 61 कोटींची विकासकामे

राज्‍यातील ग्रामीण भागातील पर्यटनवाढीसाठी सुमारे 61 कोटी 52 लाख 92 हजार रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यातील काही कामे सुरू असून, काही कामांच्‍या निविदा काढणे बाकी असल्‍याचे लेखी उत्तर पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी सभागृहात दिले. मुरगावचे आमदार संकल्‍प आमोणकर यांनी याबाबतचा अतारांकित प्रश्‍न विचारला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT