Goa Job Fair
Goa Job Fair Dainik Gomantak
गोवा

Goa Job Fair: 500 युवकांना मिळाला रोजगार, 4,800 जण शॉर्टलिस्ट

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Job Fair: गोव्यात आयोजित दोन दिवसीय रोजगार मेळाव्यात 500 युवकांना रोजगार मिळाला आहे. तर, तब्बल 4,800 जण शॉर्टलिस्ट झाले आहेत. गोवा सरकारतर्फे आयोजित या रोजगार मेळाव्यासाठी तब्बल 21 हजार युवकांनी नोंदणी केली होती. अशी माहिती रोजगार आणि कामगार आयुक्त राजू गवस यांनी दिली आहे. आयटी, वैद्यकीय, फार्मा यासह विविध क्षेत्रातील कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात उपस्थिती लावली होती.

पहिल्या दिवशी मेगा जॉब फेअरसाठी 4,658 उमेदवारांनी हजेरी लावली होती. त्यापैकी 273 जणांना नोकरी मिळाली तर, 3,235 जण शॉर्टलिस्ट झाले होते. तर पहिल्यादिवशी 1,097 जण पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीतून बाहेर पडले होते. गवस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी युवकांना रोजगार मिळाला असून, त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. दरम्यान, दहा हजार जण वेगवेगळ्या फेरीतून बाद झाले आहेत. तसेच, ही आकडेवारी अंतिम नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने आयोजित केलेल्या दोन दिवसीय रोजगार मेळाव्यात दीडशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. खासगी क्षेत्रातील एकूण चार हजारहूंन अधिक नोकऱ्या या मेळाव्याद्वारे गोमंतकीयांना देण्याचे उद्दिष्ट सरकारटचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

SCROLL FOR NEXT