Goa CM Pramod Sawant 
गोवा

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा विद्यापीठात मोठ्या प्रमाणात साधनसुविधा आहेत, मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात असूनही विद्यापीठाचे मानांकन ढासळतेच कसे, हा माझ्यापुढील प्रश्न आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विद्यापीठाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली.

विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या अर्ध्याहून अधिक पदवीधरांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, हे माहीत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

गोवा विद्यापीठ संशोधन पार्कच्या उद्घाटनसमयी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर, कुलसचिव प्रो. विष्णु नाडकर्णी आदी उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षांची माहितीच नाही !

राज्यातील विद्यार्थी जो पदवीचे शिक्षण घेतो, त्याला गोवा विद्यापीठाकडून पदवी देण्यात येते, परंतु मला खंत वाटते की, राज्यातील पदवीचे शिक्षण घेतलेल्या ५० टक्के विद्यार्थ्यांना जीपीएससी परीक्षा म्हणजे काय किंवा स्पर्धात्मक परीक्षा कोणत्या असतात याची माहिती नसते.

ज्या विद्यार्थ्यांना माहिती असते ते सांगतात, मला या परीक्षा देण्यास भीती वाटते, ८० टक्के पदवीधर विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांसाठी तयार नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाविद्यालयांनी आत्मपरीक्षण करावे!

गोवा विद्यापीठातून उत्तीर्ण होणारा विद्यार्थी कोठेच मागे पडता कामा नये. त्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयार करावे लागेल. तसे जर होत नसेल तर गोवा विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी आपण कोठे कमी पडतो, याची कारणे शोधायला हवीत.

जर तसे केले नाही तर विद्यापीठातील२-३ टक्के विद्यार्थी संशोधक होतील. मात्र ५० टक्क्यांहून अधिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? या प्रकारामुळे राज्यात अनेक प्रश्न निर्माण होतील. विद्यार्थ्यांना आपण पात्र असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती असायलयाच हवी कारण आजचे युग हे स्पर्धा परीक्षांचे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT