Sattari Rain Dainik Gomantak
गोवा

Sattari Rain : सत्तरी तालुक्यात बागायतदारांचे ५० लाखांचे नुकसान; चक्रीवादळाचा फटका

Sattari Rain : कृषी कार्यालयात नुकसानीचे दावे सादर करण्यास सुरुवात

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई, सत्तरी तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या चक्री वादळाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून बागायती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

केळी, नारळ, सुपारी, आंबा, निरफणस आदी झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड तसेच नासधूस झाली आहे. सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

वाळपई विभागीय कृषी कार्यालयात नुकसान भरपाईचे दावे शेतकऱ्यांनी सादर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी ताबडतोब आपल्या नुकसान भरपाईचे दावे कृषी कार्यालयात सादर करावेत, जेणेकरून लवकरच या संदर्भाचा अहवाल कृषी खात्याला सादर करण्यासाठी शक्य होईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोमवारी मध्यरात्री सत्तरीला चक्रीवादळाचा फटका बसला. यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. याचा सर्वाधिक फटका बागायतींना बसला. तसेच वीज खात्याचेही मोठे नुकसान झाले आहे. म्हाऊस, ठाणे, नगरगाव, खोतोडा, सावर्डे, केरी, पिसुर्ले या पंचायत क्षेत्रात बागायतींची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

सावर्डे पंचायत क्षेत्रातील गोपाळ गावकर यांच्या बागायतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांनी तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

केळी, सुपारीची झाडे पडली

केळी व सुपारीच्या झाड्यांची मोठ्या प्रमाणे हानी झाली आहे. केळी व सुपारीची झाडे अर्ध्यावरून मोडली आहेत. नगरगाव, कोपर्डे, ठाणे या भागात सर्वाधिक फटका बसलेला आहे.

चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे बागायतीमधील खासकरून केळी व सुपारीच्या झाडाचे नुकसान झाले आहे. तसेच नारळाच्या झाडांचीही नुकसान झाले आहे.

- विठ्ठल सावंत, कोपार्डे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT