Sound Pollution Canva
गोवा

Loud Music Issue: ‘त्या’ रेस्टॉरंट्सचा सविस्तर अहवाल द्या! ध्वनी प्रदूषणासंदर्भात गोवा खंडपीठ गंभीर

Anjuna Sound Pollution: पाच जणांविरुद्ध ध्वनीसंदर्भात २५ ते ५० तक्रारी दाखल झाल्याने खंडपीठाने त्याची दखल घेतली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Anjuna Loud Music Issue

पणजी: ध्वनी प्रदूषणासंदर्भात अधिकाधिक तक्रारी दाखल झालेल्या हणजूण येथील पाच रेस्टॉरंट्स व पब्सना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने प्रतिवादी करून नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी तिघांनी आज प्रतिज्ञापत्र सादर केले.

प्रदूषण देखरेख यंत्रणा बसवण्यात आल्याची माहिती दिली आहे. ही यंत्रणा बसवण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Goa Pollution Control Board) वेळेची मर्यादा निश्‍चित न करता वेळोवेळी त्रुटी ठेवत असल्याबाबत खंडपीठाने (Goa Bench) अवमान याचिकेवरील सुनावणीवेळी नाराजी व्यक्त करण्याबरोबरच त्यांचा सविस्तर तपासणी अहवाल देण्यास सांगितले आहे. पहिल्या पाच जणांविरुद्ध ध्वनीसंदर्भात २५ ते ५० तक्रारी दाखल झाल्याने खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेतली होती.

या पाचजणांपैकी तिघांनी सादर केलेल्या उत्तरात प्रदूषण नियंत्रण देखरेख यंत्रणा बसविली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याची जेव्हा पाहिजे तेव्हा तपासणी करावी व कनेक्टिव्हीटी सुरू करावी अशी बाजू या रेस्टॉरंट्सच्यावतीने त्यांच्या वकिलांनी मांडली. खंडपीठाने या रेस्टॉरंट्स व पब्सने उभारलेल्या प्रदूषण देखरेख यंत्रणेबरोबरच तेथील भौगोलिक स्थितीचीही सविस्तर माहिती अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

...परवानगी सक्तीची!

प्रदूषण नियंत्रण मंडळाने हणजूण भागातील रेस्टॉरंट्स व पब्सना कन्सेट टू ऑपरेट परवानी सक्तीची केली होती. या कन्सेट टू ऑपरेट नोटिशीबरोबर संबंधित रेस्टॉरंट्सनी प्रदूषण देखरेख यंत्रणा बसवण्याची दुरुस्ती अधिसूचना जारी केली होती. नोटिस बजावल्यापासून संबंधित रेस्टॉरंट्स व पब्सनी ही यंत्रणा बसवणे आवश्‍यक आहे, त्यासाठी वेळेच्या मर्यादेची आवश्‍यकत नाही. ज्या दिवशी नोटीस दिली, तेव्हापासून लगेच त्याची अंमलबजावणी होणे आवश्‍यकता आहे, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT