Goa Drishti Lifeguard Dainik Gomantak
गोवा

Goa Drushti Lifeguards: ‘दृष्टी’ जीवरक्षकांकडून 5 जणांना जीवदान!

मोठ्या विकेंडमध्ये कामगिरी : समुद्र खवळलेला असतानाही पर्यटकांना वाचविले

दैनिक गोमन्तक

पणजी: 11 ते 16 ऑगस्टदरम्यानचा सुट्टीचा मोठा विकेंड साजरा करण्यासाठी राज्यातमोठ्या संख्येने पर्यटक आले होते. त्यातील बहुतांशजण किनारी भागाकडे वळले. या विकेंड काळात दृष्टी संस्थेच्या जीवरक्षकांनी भरीव कामगिरी केली. समुद्रात बुडणाऱ्या पाच जणांचे प्राण जीवरक्षकांनी वाचवले. यातील तीन घटना अनुक्रमे पाळोळे, बाणावली आणि शिकेरी येथील आहेत, अशी माहिती ‘दृष्टी’कडून देण्यात आली.

(5 people were saved by 'Drishti' lifeguards)

राज्यात मान्सून अजूनही सक्रिय असून, समुद्र खवळलेला आहे. पाण्याखालील तीव्र प्रवाह, उंच लाटा आणि पाऊस यांसह हवामानात होणाऱ्या बदलांमुळे समुद्रात स्नानासाठी जाण्यास मज्जाव केला आहे. तरीदेखील या सूचनांकडे कानाडोळा करून पर्यटक समुद्रात जातातच. त्यामुळे वारंवार दुर्घटना घडत असल्याचे दिसून येते.

सायकलसह वाहून गेलेला मुलगा बचावला : बाणावलीत समुद्र किनाऱ्यावर सायकल चालवणाऱ्या 14 वर्षीय मुलाचे नियंत्रण सुटून तो थेट समुद्रात पडला. जोरदार प्रवाहामुळे तो खोलवर पाण्यात वाहून गेला. मात्र, हात जोरजोरात हलवून त्याने मदतीसाठी इशारा केला. तेथील जीवरक्षक सागरचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि त्याने तत्काळ समुद्रात उडी मारली. रेस्क्यू ट्यूबच्या मदतीने त्या मुलाला किनाऱ्यावर आणले. जीवरक्षकाने त्याची सायकलही समुद्रातून बाहेर काढली.

चार वर्षांच्या मुलाला पाण्याबाहेर काढले

शिकेरी समुद्र किनाऱ्यावर एक 4 वर्षांचा मुलगा आणि त्याचे कुटुंब समुद्रस्नान होते. तेव्हा आलेल्या जोरदार लाटेमुळे मुलगा कुटुंबापासून विभक्त झाला आणि पाण्यात ओढला गेला. हा प्रकार नजरेस येताच जीवरक्षकांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. रेस्क्यू ट्यूबच्या साहाय्याने त्याला किनाऱ्यावर आणले. वैद्यकीय तपासणीनंतर तो मुलगा अस्वस्थ आढळला. जीवरक्षकांनी त्याला जवळच्या आरोग्य केंद्रात नेल्यानंतर त्याची प्रकृती पूर्ववत झाली आणि त्याचे प्राण वाचले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT