Water Logged Road Due To Heavy Rain In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: दोन दिवसांत पाच बळी, थार वाहून गेली, भिंत कोसळली; गोव्यात पावसाचा हाहाकार

Pramod Yadav

गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला असून, काही भागात पूरस्थिती निर्माण झालीय. तर, विविध ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

नानोडा डिचोलीत पूराच्या पाण्यात थार कार वाहून गेल्याचा प्रकार समोर आला. दुसरीकडे गेल्या दोन दिवसांत राज्यात भिंत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनुसार गोव्यात रविवारी आणि सोमवारी मुसळधार पाऊस झाला. रविवारी कुंडईत संरक्षक भिंत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. जेवण करुन खोलीत आराम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर भिंत कोसळल्याने तिघांचा बळी गेला.

या दुर्घटनेत मुकेशकुमार सिंग (38) बिहार, त्रिनाथ नायक (47) ओरिसा आणि दिलीप यादव (37) बिहार हे तीन कामगार ठार झाले.

सोमवारी देखील राज्यात पावसाचा जोर कायम होता. यात मियाभाट मंडूर येथे भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. मारिया रॉड्रिग्ज (70) आणि आल्फ्रेड रॉड्रिग्ज (51) असे यात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

डिचोलीत थार गेली वाहून

नानोडा- डिचोलीत पुराच्या पाण्यात थार जीप घालणे पर्यटकाच्या अंगलट आले. दैव बलवत्तर म्हणून जीपमधील युवक आणि युवतीचा जीव बचावला मात्र, थार जीप पुराच्या पाण्यात वाहून गेली.

डिचोलीत पावसाने थैमान घातले असून, मये साखळीसह तालुक्याच्या विविध भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या.

पाली सत्तरी धबधब्यावर अडकलेल्या 150 जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले.

एक कोटीचे नुकसान

गोव्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावासामुळे विविध घटनांमध्ये एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पावसामुळे ९५ वीज खांब कोसळले असून अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

रविवारी अग्निशमन दलाला तब्बल 142 कॉल्स आले त्यातील सर्वाधि कॉल्स कुडचडे २९ येथून आले तर म्हापसा येथून २८ आणि वाळपई येथून २५ कॉल्स आले. अग्निशमन दलाला राज्यातील २१.५ लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश आले.

पुढील तीन तास मुसळधार

गोव्यात हवामान खात्याने रेड अलर्ट बजावला असून, पुढील तीन तास मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने नागरिकांना पाण्याच्या भागात न जाण्याची सूचना दिली आहे.

सहापैकी तीन घरणे ओव्हफूल

राज्यातील सहापैकी तीन धरणे ओव्हफूल झाली आहेत. यात गावणे, साळावली आणि पंचवाडी धरणे ओव्हरफूल झाली असून, चापोली, आमठाणे आणि अंजुणे धरण पावासाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसात भरण्याची शक्यता आहे.

तिळारीतून पाण्याचा विसर्ग शक्य

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिळारी धरण देखील भरले असून, धरण ओव्हफूल झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग शक्य आहे. धरण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या गोव्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT