Taleigao Kidnapping Case 5 Arrested Dainik Gomantak
गोवा

ताळगावातील व्यक्तीचं अपहरण करत खंडणीची मागणी

पणजी पोलिसांकडून 5 संशयितांना अटक; तपास सुरु

दैनिक गोमन्तक

पणजी : ताळगाव येथील एका व्यक्तीचे अपहरण करुन खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी रात्री हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. पणजी पोलिसांना तपासाचं सुत्र वेगाने हलवत 5 संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

ताळगावात राहणाऱ्या एका व्यक्तीचं रविवारी रात्री अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणानंतर आरोपींनी त्याला करंजाळे येथील एका फ्लॅट मध्ये डांबून ठेवत मारहाण केल्याचीही माहिती आहे. यानंतर 70 लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांकडून 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मेरशी कुंभारवाडा परिसरात राहणाऱ्या विनायक देसाई या 63 वर्षीय व्यक्तीचं अपहरण करण्यात आलं होतं. देसाई यांना आरोपींनी दोना पावला येथील एका फ्लॅटमध्ये कोंडून ठेवण्यात आलं होतं. रात्री उशिरा ओल्ड गोवा (Old Goa) पोलिसांनी देसाई यांची सुटका करुन आरोपींना बेड्या ठोकल्या. आपल्या पत्नीसह सहा जणांनी अपहरण केल्याचा खुलासा पीडित विनायक देसाई यांनी केला होता. जमीनविषयक आणि वैवाहिक वादातून अपहरण झाल्याची तक्रार देसाई यांनी दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT