Panjim Fest: Dainik Gomantak
गोवा

Panjim Fest: महापालिकेला फेस्तातून 47 लाखांचा महसूल

Panjim Fest: पणजीतील मेरी इमॅक्युलेट चर्चचे नुकतेच फेस्त पार पडले. या फेस्तनिमित्त शहरात खाजे, फुटाणे-शेंगदाणे आणि इतर वस्तूंच्या स्टॉल्सची फेरी लावण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

Panjim Fest: पणजीतील मेरी इमॅक्युलेट चर्चचे नुकतेच फेस्त पार पडले. या फेस्तनिमित्त शहरात खाजे, फुटाणे-शेंगदाणे आणि इतर वस्तूंच्या स्टॉल्सची फेरी लावण्यात आली होती. त्या फेरीतून महानगरपालिकेच्या तिजोरीत 47 लाख रुपयांचा निधी आल्याची माहिती आयुक्त क्लेन मदेरा यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

महानगरपालिकेला फेस्ताच्या माध्यमातून गतवर्षी 16 लाखांचा निधी आला होता. परंतु यावेळी तो 47 लाखांवर पोहोचला. नऊ दिवसांच्यावर ही फेरी ठेवण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे व्यावसायिकांच्या विनंतीवरून मांडवी किनारी पदपथावरील दुकानांना तीन दिवस अधिक मुदत वाढवून दिली. त्यातून तीन दिवसांचा महसूल महानगरपालिकेला मिळाला.

यापूर्वी गणेशोत्सवाच्या वेळी भरणाऱ्या अष्टमीच्या फेरीत महानगरपालिकेला 90 लाखांचा महसूल मिळाला होता. मागील काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेला फेरीतून मिळणारा निधी पाहिला तर तोही 12-13 किंवा 13-14 लाख असा राहिला होता, असेही आयुक्त म्हणाले. सध्या महानगरपालिकेला दररोजची महसूल प्राप्ती सोपो करातून होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT