Murder At Merces Dainik Gomantak
गोवा

Murder At Merces: मेरशीत 39 वर्षीय व्यक्तीचा खून, झुडपात सापडला मृतदेह

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Pramod Yadav

Murder At Merces: मेरशी येथे 39 वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. विशाल गोलटकर असे या व्यक्तीचे नाव असून, झुडपांमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेरशी येथे आज दुपारी एक मृतदेह आढळून आला. स्थानिक विशाल गोलटकर याचा हा मृतदेह असल्याची ओळख पोलिसांनी केली आहे. मृतदेह ताब्यात घेतला असून, शवचिकित्सेसाठी गोमेकॉ येथे नेण्यात आला आहे.

पूर्ववैमनस्यातून विशाल याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, याबाबत अधिक तपास केल्यानंतरच माहिती समोर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

विशालच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्यासारख्या जखमा आढळून आल्या आहेत. त्याच्या बहिणीने याबाबत ओल्ड गोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT