National Sports Competition : सासष्टी, ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनास केवळ सहा दिवस बाकी असताना फातोर्डा स्टेडियम क्रीडा संकुल मैदान, टेनिस कोर्ट,
इनडोअर स्टेडियमचे काम, दुरुस्ती, रंगरंगोटी जोरात सुरू आहेच, शिवाय स्टेडियमकडे जाणारे रस्ते व इतर काही रस्त्यांनाही नवी झालर देण्याचे काम सुरू झाले आहे.
जिल्हा इस्पितळ ते कोलवा सर्कल, रवींद्र भवनसमोरील रस्ता, फातोर्डा ते आर्लेम सर्कल रस्त्याचे हॉटमिक्सिंग, त्याचबरोबर दुभाजकांना पिवळा व पांढरा रंग काढण्याचे काम सुरू झाले आहे.
शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडेझुडपे कापली जात आहेत.
याचाच फायदा घेऊन घाऊक मासळी मार्केटसमोरील रस्त्याचेही हॉटमिक्सिंग करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी जी-२० बैठकांच्या निमित्ताने हा रस्ता दुरुस्त करण्यात आला होता.
आता दुसऱ्यांदा या रस्त्याचे हॉटमिक्सिंग होत आहे.
कदंब बसस्थानकाकडील रस्त्याचेही हॉटमिक्सिंग
मडगाव कदंब बसस्थानकाचा रस्ता एकदम खराब झालेला आहे. यासाठी आता ६६ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आले आहे.
या कामाचे कंत्राट बोर्जिस नामक कंत्राटदाराला मिळाले असल्याचे कदंब महामंडळाचे चेअरमन तथा नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.