Goa Statehood Day
Goa Statehood Day Dainik Gomantak
गोवा

Goa Statehood Day: गोव्यासह 'या' दोन राज्यात साजरा झाला 36 वा गोवा घटकराज्य दिन

Pramod Yadav

Goa Statehood Day: गोवा 30 मे 1987 मध्ये गोवा भारतीय संघराज्याचे 25 वे राज्य बनले. राज्याचा 36 वा घटकराज्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. गोवासह आसाम आणि तेलंगणा राज्यातील राजभवनात गोवा घटकराज्य दिन साजरा करण्यात आला.

गोव्यासह तेलंगणा आणि आसाम येथील राजभवनात गोवा घटकराज्य दिन साजरा

तेलंगणा राजभवन येथे गोवा घटकराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गोव्याच्या सांस्कृतिक वैविध्येतील एकता आणि गोमन्तकीयांच्या स्वातंत्र्य संघर्षाचे स्मरण करूया. असा शुभेच्छा संदेश तेलंगणाच्या राज्यपाल डॉ. तमिलिसाई सुंदरराजन यांनी दिला आहे.

तसेच, आसामच्या राजभवनात देखील गोवा घटकराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

"आज राजभवन येथे गोवा राज्य स्थापना दिन साजरा करताना आनंद होत आहे. आसाम आणि गोवा यांच्यातील संबंध मजबूत करणे, दोन्ही राज्यांच्या मौल्यवान सांस्कृतिक वारसा आणि त्याचे महत्त्व याची लोकांना जाणीव करून देण्याचा आमचा उद्देश आहे." अशा शब्दात शुभेच्छा आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी दिल्या आहेत.

याशिवाय बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश राज्यात देखील गोवा घटकराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी संबधित राज्यातील राज्यपालांनी गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

"आपल्या राज्याचे भाग्य घडविण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या असंख्य गोमंतकीयांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करूया. त्यांच्या उत्कृष्टतेचा, नाविन्यपूर्णतेचा आणि करुणेचा वारसा पुढे नेत त्यांच्या दूरदृष्टीचा, त्यागाचा आणि चिकाटीचा सन्मान करूया." असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

"30 मे हा गोव्याच्या गौरवशाली राजकीय इतिहासातील एक संस्मरणीय दिवस आहे, याच दिनी 1987 मध्ये गोवा हे भारतीय संघराज्याचे 25 वे राज्य बनले होते. हा दिवस गोमंतकीयांनी आपली ओळख जपण्यासाठी केलेल्या संघर्षाचा परिणाम आहे." असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Pernem News : पेडणे तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’; रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी दुरुस्त होतील का

Goa Today's Live News: मडगाव येथे अपघातात एक ठार, एक जखमी

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT