Ranchi Crime News  Gomanatak Digital Team
गोवा

Ranchi: भररस्त्यातून लुटले 35 लाख, दरोडेखोरांची गोव्यात रासलीला; एका चुकीमुळे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

पैशांच्या बॅग घेऊन दरोडेखोर गोव्याला फरार झाले.

Pramod Yadav

Ranchi: पैशांनी भरलेली बॅग भररस्त्यातून चोरी केल्याची घटना 11 सप्टेंबर रोजी रांची येथून समोर आली. पंदा बाजार समितीतील व्यावसायिकाने त्याच्या कर्मचाऱ्याकडे 35 लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी दिली.

पैशांच्या बॅग घेऊन दरोडेखोर गोव्याला फरार झाले. गोव्यात जाऊन त्यांनी मौजमजा केली आणि तेथून केरळ गाठले.

रांची पोलिसांनी 35 लाखांच्या दरोड्याप्रकरणी श्याम सुंदर जालान, धीरज जालान, हर्ष गुप्ता, सचित साहू, अरुण कुमार आणि सुनील कुमार यांना अटक केली आहे. आरोपींकडून 22 लाख रुपये, सोळा दुचाकी आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, दरोडा टाकल्यानंतर टोळीतील श्याम सुंदरला 20 लाख रुपये देऊन गोव्याला पाठवले. गोव्यात मौजमजा केल्यानंतर सर्व आरोपी केरळला फरार झाले.

तेथून कन्याकुमारीमार्गे बेंगळुरूला पोहोचले आणि त्यानंतर रांचीला गेले. कोणालाही दरोड्याची खबर नाही अशी समजूत दरोडेखोरांची झाली, त्यामुळे ते पुन्हा रांचीला परतले होते.

दरम्यान, आरोपी धीरज जालन सुखदेव नगर परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तात्काळ धीरजला अटक केली. त्यानंतर अन्य आरोपींना पकडण्यात आले. या टोळीत आणखी तीन सदस्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. फरार आरोपींकडे तीन लाख रुपये आहेत.

या टोळीतील सदस्य फक्त नवीन दुचाकींची चोरी करत होते. रांचीमधून चोरलेल्या बाइक हजारीबाग, गुमला, खुंटी आणि इतर जिल्ह्यांमध्ये विकल्या जात. या टोळीचा अशा 24 घटनांमध्ये सहभाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कुटुंबांच्या भांडणात आणली तलवार! Video Viral झाल्यामुळे पोलिसांची तारांबळ; संबंधिताविरोधात गुन्हा नोंद

Pernem Theft: पेडण्यात दिवसाढवळ्या घरफोडी; 4.5 लाखांचा ऐवज लंपास, घर बंद असताना मारला डल्ला

P S Sreedharan Pillai: राजभवनाचे लोकभवनात रूपांतर करणारे 'पी. एस. श्रीधरन पिल्लई'

Goa Politics: भाजपशी काहींचे ‘जॉईंट व्‍हेंचर’! सरदेसाईंचा अमित पाटकरना टोला; भूरूपांतरणावरुन रंगला कलगी तुरा

Goa Taxi: 'टॅक्‍सी व्‍यवसायातील भोंगळ व्‍यवस्‍थेमुळे पर्यटकांमध्‍ये घट'! गुदिन्‍हो यांचा दावा; पारदर्शकतेसाठी ‘कॅब ॲग्रीगेटर’ धोरण

SCROLL FOR NEXT