Goa Farmers : मडगाव क्षेत्रिय कार्यालयाने या वर्षात विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली व सुमारे 4,570 लाभधारक शेतकऱ्यांना 3.25 कोटी रुपयांचे अनुदान (सबसिडी) दिले.
क्षेत्रिय कृषी अधिकारी जॅकिस शेरीफ यांनी सांगितले, की मडगाव कार्यालयाने विविध कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यामुळेच हे ध्येय साध्य झाले. यंदा कार्यालयाकडे विविध योजनांसाठी आलेले सर्व अर्ज मंजूर केले. ते बहुतांश भात शेतीवरील अनुदानासाठीच होते. भातावर प्रतिप्रमाणे किलोमागे 20 रुपये अनुदान मिळते.
सासष्टीत 1281 लाभधारक असून त्यांना 1.47 कोटी अनुदान मिळाले. येथील बागायतदार शाखेत भात दिले, तरीही या योजनेचा थेट लाभ दिला जातो. भाजी लागवडीवरही अनुदान दिले जाते अशी माहितीही शेरीफ यांनी दिली.
मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी मोठ्या संख्येने यांत्रिकीकरणाकडे वळू लागले आहेत. मडगाव कार्यालयातून या योजनेखाली 172 जणांनी सबसिडीचा लाभ घेऊन विविध यंत्रे खरेदी केली. तसेच सेंद्रिय शेती योजनेचा 192 शेतकऱ्यांनी, तर एसटी बांधवांसाठी असलेल्या योजनेचा लाभ 152 जणांनी लाभ घेतला, असे त्यांनी सांगितले.
नारळ लागवडीसाठी अनुदान आहेच, शिवाय नारळाला 12 रुपये आधारमूल्य असून त्या योजनेचा 188 उत्पादकांनी लाभ घेतला. हा दर खूपच जुना असल्याने त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारकडे आहे. शेजारील राज्यांतून येणारा नारळ स्वस्त आहे. कारण तेथील उत्पादन खर्च कमी, तर गोव्यात जास्त असल्याने साहजिकच दरही जास्त आहेत.
मनुष्यबळाची कमतरता
मडगाव कार्यालयात मनुष्यबळाची कमतरता आहे. त्याबाबत वरिष्ठांना कळविले असून अधिक मनुष्यबळ मिळाले तर अधिक परिणामकारकपणे योजनांची अंमलबजावणी करू व तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र लागवडीखाली आणू, अशी माहिती कृषी अधिकारी जॅकिस शेरीफ यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.