3200 Rs will be charged for RT PCR test from foreign tourists in Goa pad96 Dainik Gomantak
गोवा

गोव्यात विदेशी पर्यटकांकडून RT-PCR चाचणीसाठी आकारले जाणार 3200 रूपये

लसिकरणात गोवाही आघाडीवर! राज्यात 8 लाख 43 हजार 9 जणांनी घेतले लसीचे दोन्ही डोस

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात (Goa) गुरुवारी 4 हजार 59 चाचण्यांचा कोरोना (Covid-19) अहवाल आल्यानंतर त्यातील 59 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे सध्या राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 618 वर पोहोचली आहे. यातून कोरोनाने गोवा राज्यात पुन्हा काही प्रमाणात का होइना पण डोके वर काढल्याचे येत्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. दरम्यान, आरोग्य खात्याने दिलेल्या दैनंदिन अहवालानुसार काल गुरुवारी आणखी तीन कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात 8 लाख 43 हजार 9 जणांनी लसीचे (Vaccination) दोन्ही डोस घेतले आहेत.

रविवार, सोमवार आणि मंगळवार या तिन्ही दिवशी सलग 4 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. मात्र बुधवारी एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने दिलासाही मिळाला होता. पण गुरुवारी पुन्हा तिघांचा मृत्यू झाल्याने राज्यात चितेंचे वातावरण आहे. दरम्यान, विदेशांतून येणाऱ्या पर्यटकांकडून आरटीपीसीआर चाचणीसाठी 3 हजार 200 रूपये आकारले जाणार आहे. या चाचणीसाठी दोबोळी विमानतळावरच खाजगी संस्थेला RTPCR चाचणीचे कंत्राट देण्यात आले. 3 हजार 200 रूपयांपेक्षा पर्यटकांकडून जास्त पैसे आकारू नये असेही गोवा सरकारने संस्थेला सांगितले आहे.

भारतात 100 कोटींचे लसीकरण पूर्ण

भारतोन लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा गुरुवारी पार केला आहे. 16 जानेवारीला लसीचा पहिला डोस दिला गेला होता. त्यानंतर 278 दिवसांनी हा टप्पा भारताने पार केला आहे. यामध्ये गोव्यातील 8 लाख 43 हजार 9 जणांचा समावेश आहे. कोविड लसिकरणाचा पहिला डोस गोवा राज्यातील सगळ्या लोकांनी घेतला आहे. आणि दुसरा डोसही 72 टक्के लोकांनी घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT