Banyan Tree Uprooted and replanted in calangute Dainik Gomantak
गोवा

आधी 300 वर्षे जूने वडाचे झाड मुळासकट उखडले, मग क्रेनच्या मदतीने केले पुनर्रोपण; कळंगुटमधील बिल्डरचा अजब प्रकार

५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला एका बांधकाम व्यावसायिकाने हे झाड उन्मळून पाडले होते

दैनिक गोमन्तक

एका खाजगी इमारतीच्या बांधकामासाठी कळंगुट येथे 300 वर्षे जुने वडाचे झाड मुळासकट उखडून काढण्यात आले होते. मात्र कळंगुटचे प्रेमानंद दीवकर आणि स्थानिकांनी याबाबत आक्षेप घेत याबाबत आंदोलन केले होते.

५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला एका बांधकाम व्यावसायिकाने हे झाड उन्मळून पाडले होते.

त्यानंतर, दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर कळंगुट येथील खोब्रावाडा येथे उन्मळून पडलेल्या वटवृक्षाचे शुक्रवारी पुनर्रोपण करण्यात आले. यासाठी तीन क्रेनचा वापर करण्यात आला. सदर इमारतीच्या परिसरातच हे झाड पुन्हा लावण्यात आले.

स्थानिकांनी आणि कळंगुट मतदारसंघ मंचाच्या (सीसीएफ) सदस्यांनीही दावा केला होता की, बांधकाम व्यावसायिक, ज्याने स्वतः क्रेन आणले होते, ते झाड खूप जड आहे आणि ते छाटणे आवश्यक आहे असे सांगून जाणीवपूर्वक झाडाची पुनर्लावणी थांबवत होता. पण नंतर बहुतांश फांद्या तोडून संध्याकाळपर्यंत झाड सरळ करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ukraine Attack: युक्रेनचा रशियाच्या तेल गोदामावर हल्ला! स्फोटानंतर भडकली आग; रशियाने डागली 7 क्षेपणास्त्रे, 76 ड्रोन

Himachal Rain: 307 रस्ते बंद, 100 पेक्षा जास्त मृत्यू; जोरदार पावसामुळे हिमाचलमध्ये जनजीवन विस्कळित

Goa Leopard: रात्री 11 वाजता कुत्र्याला पळवले, शिगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; ग्रामस्थांची उडाली झोप

Mandovi Bridge Accident: मांडवी पुलाजवळ भीषण अपघात! कारला दुचाकी धडकल्या; दोन्ही चालक गंभीर जखमी

Marathi Language: '..पेटून उठण्याची वेळ आली आहे', वेलिंगकरांचा निर्धार; मराठीला संपवण्याचे षडयंत्र सुरू असल्याची भीती व्यक्त

SCROLL FOR NEXT