Margao Crime News 
गोवा

Margao Crime News: धक्कादायक! गांधी मार्केटमध्ये सापडलेल्या 3 वर्षांच्या मुलीला 'त्या' अज्ञात जोडप्यानेच तिथे सोडले?

जी तीन वर्षांची मुलगी सापडली होती, तिला एका अज्ञात जोडप्यानेच तिथेच आणून सोडले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Kavya Powar

Margao Crime News: शनिवारी (27 जानेवारी) मडगावातील गांधी मार्केटमध्ये तीन वर्षांची बेवारस मुलगी पोलिसांना सापडली. त्यानंतर तिच्या अज्ञात पालकांचा शोध घेणे सुरू होते. त्याबाबत आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

जी तीन वर्षांची मुलगी सापडली होती, तिला एका अज्ञात जोडप्यानेच तिथेच आणून सोडले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यापूर्वी त्याच जोडप्याने एका दोन वर्षांच्या मुलाला मडगाव रेल्वे स्टेशनवर सोडून दिले होते, ही बाब पुढे आली आहे. ही लहान मुलगी सापडल्यानंतर बायलांचो एकवटोच्या अध्यक्ष ऑडा व्हिएगस यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आणि याबाबत कसून चौकशी करण्याची विनंती केली होती.

त्यामुळे ही दोन्ही मुले बहीण भाऊ असावीत आणि त्यांच्या आई-वडिलांनीच त्यांना असे उघड्यावर सोडले असावे, असा तर्क व्यक्त करण्यात येत आहे.

मडगाव रेल्वे स्थानकावर शनिवारी आरपीएफ पोलिसांना दोन वर्षाचा मुलगा सापडला होता. या मुलाला ते जोडपे सोडून जात असल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. हे जोडपे शनिवारी नेत्रावतीने मडगावात आले. जोडपे कुठून दाखल झाले, हे समजले नाही. मडगाव पोलिस जोडप्याचा शोध घेत आहे. सध्या त्या मुलांना जिल्हा बाल कल्याण समितीकडे दिले आहे. याबाबत पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT