Ponda Theft Dainik Gomantak
गोवा

Robbery in Ponda : फोंड्यात एका रात्रीत तीन चोरीच्या घटना

खांडोळा येथील महागणपती मंदिरात लाखोंचे दागिने लंपास; चोरट्यांनी दोन एटीएम मशीनही पळवली

गोमन्तक डिजिटल टीम

Robbery in Ponda : फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत काल बुधवारी रात्री तीन चोऱ्या झाल्या असून तिन्ही चोर्‍यामध्ये एकाच टोळक्याचा हात आहे का अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. खांडोळा - माशेल येथील गणपती मंदिर तसेच कुंकळ्ये येथे दुकान फोडीचा अयशस्वी प्रयत्न झाला मात्र झटापटीत दुकानदार जखमी झाला.

तिसरी मोठी चोरी तिस्क - उसगाव येथे झाली असून चोरट्यांनी एचडीएफसी आणि कॅनरा बँक अशा दोन बँकांची एटीएम रात्री पळवली. चोरट्यांनी जवळच असलेल्या कुळण येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी ही एटीएम फोडली. दोन्ही एटीएम मधून किती पैसे पळवले ते समजू शकले नाही. कुंकळ्ये - म्हार्दोळ नारायणवाडा येथे रात्री एका दुकानात शिरुन चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र दुकानदाराला संशय आल्याने त्याने धाव घेतल्याने चोरट्यांनी फ्रीजमधील बाटल्यांचा मारा त्याच्यावर केला.

या हल्ल्यात दुकानदार गुरुदास सदाशिव कुर्टीकर वय 52 जखमी झाले. त्यांना इस्पितळात नेण्यात आले. दुकानदाराने आरडाओरड केल्याने चोरटे दोन दुचाक्या सोडून पळाले. फोंडा पोलिसांनी दुचाक्या ताब्यात घेतल्या असून पुढील चौकशी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT