Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: कायद्याच्या रक्षकांकडूनच त्रास; दिल्लीच्या पर्यटकांशी गैरवर्तन, गोव्यात तीन वाहतूक पोलिस निलंबित

Traffic Police Suspended In Goa: पर्यटक चालकांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी हणजूण वाहतूक पोलिस कक्षाच्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचा हा आदेश आज वाहतूक पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी काढला.

गोमन्तक डिजिटल टीम

Three Traffic Police Suspended For Misbehaving With Tourists In Goa

पणजी: पर्यटक चालकांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी हणजूण वाहतूक पोलिस कक्षाच्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचा हा आदेश आज वाहतूक पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी काढला. याप्रकरणी त्यांची पोलिस खात्यांतर्गत चौकशी होणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या व गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही, असे शिरवईकर यांनी सांगितले.

निलंबित वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये साहाय्यक उपनिरीक्षक मोहन चोपडेकर, हवालदार गोविंद मांद्रेकर, कॉन्स्टेबल प्रशांत शेट्ये यांचा समावेश आहे. या तिघांनी ड्युटीवर असताना पर्यटकांशी गैरवर्तन केल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आली होती.

पर्यटकांना विनाकारण विविध प्रश्‍न विचारून त्यांची नाहक सतावणूक केली होती. वरिष्ठांकडे आलेल्या तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर या पोलिसांची वर्तणूक गैर असल्याचे आढळून आले होते. वाहनचालकांविरुद्ध कारवाई करताना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले होते

तसेच बॉडीलाईन कॅमेरा रस्त्यावर असताना सुरू ठेवणे सक्तीचे आहे. मात्र, तो बंद होता. त्यामुळे पर्यटक व पोलिसांमध्ये झालेल्या संवादाची माहिती या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली नव्हती. हा कॅमेरा बंद ठेवण्यामागील कारण हे पोलिस देऊ शकले नव्हते. नियमांचे पालन न करणाऱ्या तसेच पर्यटकांशी नाहक हुज्जत घालणाऱ्या वाहतूक पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT