Margao Woman Assaulted Dainik Gomantak
गोवा

Margao Woman Assaulted: मडगावात 3 गुंडांची महिलेला जबर मारहाण; हात-पाय मोडला...

मारहाण करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार; गुन्हा दाखल

Akshay Nirmale

Margao Woman Assaulted: मडगाव कोकण रेल्वे भाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथे एका महिलेला अत्यंत क्रुर पद्धतीने मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन गुंडांनी या महिलेला मारहाण केली आहे. या मारहाणीत महिलेला जबर मार बसला असून तिचा हात आणि पाय मोडला आहे. सध्या तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील एक मथुरा नावाचा बेकायदा बार आहे. या बारला परवाना नाही. हा बार रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत विनादिक्कत सुरू असतो. तिथे वारंवार महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत.

रात्री बारा ते साडेबारच्या सुमारास ही घटना या भागात घडला. येथून ही महिला जेवण घेऊन जात होती. यावेळी सुनीलकुमार सिंग, सुजितकुमार सिंग आणि दीपू हे तिघे तिथे बसले होते. त्यांनी तिला बेदम मारहाण केली.

महिला पोलिसांसाठी असलेली पिंक कार आली पण त्यांनी काहीही केले नाही. गस्तीवर असलेल्या पोलिसांनीही काहीही कारवाई केली नाही. त्यानंतर रूग्णवाहिका आली, त्यावेळी स्थानिकांनी त्या महिलेला रूग्णवाहिकेतून रूग्णालयात दाखल केले. या मारहाणीत महिलेचा हात आणि पाय मोडला आहे.

कोणत्या कारणावरून मारहाण करण्यात आली, याची कल्पना नाही. ज्यांनी मारहाण केली त्यापैकी सुनीलकुमार सिंग रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे तर सुजितकुमार डबल मर्डरचा गुन्हा आहे. त्यांचा आणखी एक साथीदार दीपू यांनी ही मारहाण केली.

या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संबंधित महिलेकडून माहिती घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT