Lata Mangeshkar  Dainik Gomantak
गोवा

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे गोव्यात 3 दिवस दुखवटा

केंद्र सरकारने देखील 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

प्रसिध्द गायिका लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे गोवा राज्य सरकारने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. केंद्र सरकारने देखील 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांचे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (State Government Lata Mangeshkar)

गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लतादिदींना कोरोनासोबतच (COVID-19) न्यूमोनियाची लागण झाली होती.

दरम्यान, गोवा भाजपाने देखील आपले पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. आज दि. 6 रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गोव्याच्या (Goa) दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते भाजपाच्या जाहीरनाम्याचे अनावरण केले जाणार होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आभासी मार्गदर्शन सभा आयोजित केली होती. हे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले असल्याचे पत्रकात म्हटले आहे. तसेच पक्षाचे इतर राज्यस्तरीय कार्यक्रमही स्थगित केल्याचे यात म्हटले आहे. या कार्यक्रमांची पुढील तारीख नंतर कळवली जाईल, असे तानावडे यांनी सांगितले आहे आहे.

लता मंगेशकर यांची कारकीर्द

सात दशकांच्या दीर्घ गायन (Singer) कारकिर्दीत, लता मंगेशकर यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायिका होत्या. लतादीदींना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 15 बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तो 'ये कहां आगे हम', 'प्यार किया तो डरना क्या', 'दिल अपना' आणि 'अजीब दास्तान है ये', 'ए मेरे वतन के लोगों' आणि 'लग जा गले' मधील मुगल-ए-आझममधील आहे. प्रीत परा.' इतर अनेक आयकॉनिक गाणी त्यांनी गायली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT