Goa Taxi and American Tourist issue Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: टॅक्सी चालकांची मुजोरी नडली; फ्रान्सच्या पर्यटकांना घेऊन येणारी 3 क्रुझ जहाजे रद्द होण्याची शक्यता...

मुरगाव बंदरातील टॅक्सीचालक-अमेरिकन पर्यटक वादाचा परिणाम

Akshay Nirmale

Goa Taxi: गोव्यात बुधवारी मुरगाव बंदरात घडलेल्या प्रकाराने गोव्याच्या पर्यटन हंगामासमोर भीती निर्माण झाली आहे. मुरगाव बंदरात दाखल झालेल्या जहाजातून आलेल्या अमेरिकन पर्यटकांची येथील मुजोर टॅक्सी चालकांनी अडवणूक केल्याच्या प्रकाराचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

दुपारी झालेल्या या प्रकारानंतर फ्रान्सच्या पर्यटकांना घेऊन गोव्यात येणारी तीन क्रुझ जहाजे रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोव्यातील टुर ऑपरेटर्सनी भीती व्यक्त केली आहे. अमेरिकन पर्यटकांनी त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग त्यांच्या दुतावासाला कळवला. त्यामुळे एकुणच आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये चुकीचा संदेश गेल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच सूत्रांच्याा माहितीनुसार फ्रान्सची ही तीन क्रुझ जहाजे रद्द होण्याची शक्यता आहे.

मुरगाव हार्बर क्रुज जेटीवर बुधवारी सायंकाळी अमेरिकन पर्यटक जहाज 'ओशन ओडीसी ' दाखल झाले होते. हे जहाज मुंबईतून आले होते. यावेळी जहाजातले 40 पेक्षा जास्त अमेरिकन जेष्ठ नागरिकांनी गोवा भ्रमंतीसाठी खासगी बस बूक केली होती. मात्र बस व्यवसायिकडे क्रुज जेटीवर जाण्याची परवानगी नसल्याने, पर्यटक बस क्रुज जेटी बाहेर थांबल्या होत्या. यामुळे विदेशी पर्यटक जहाजापासून चालत बसकडे जात असताना, त्यांना टॅक्सी व्यवसायिकांनी टॅक्सी मधून येण्याची सक्ती करत त्यांची अडवणूक केली.

यावरून पर्यटक टॅक्सी व्यवसायिक व पर्यटक बस व्यवसायिक यांच्यात झालेल्या बाचाबाचीमुळे, अखेर विदेशी पर्यटकांनी पुन्हा जहाजामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या पर्यटकांनी अमेरिकन दुतावास कार्यालयात याची तक्रार केली. प्रकरण गंभीर असल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या प्रकरणी त्वरीत कारवाई करण्याचे आदेश गृह विभागाला दिले.

याप्रकरणी दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक अभिषेक धनिया यांनी मुरगाव पोलिस स्थानकांत येऊन मुरगाव पत्तन प्राधिकरण, पर्यटक जहाजे हाताळणारी जीएम बक्सी कंपनी, मुरगाव तालुका पोलिस उपअधिक्षक, मुरगाव सहाय्यक वाहतुक संचालक, पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांची संयुक्तपणे बैठक घेतली. तसेच यापुढे गोव्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना कोणी सतावल्यास, राज्याचा गृह विभाग सहन करणार नसल्याची माहिती पोलिस अधिक्षक अभिषेक धनिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

SCROLL FOR NEXT