Madgaon Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : गोव्यात गेल्या 10 वर्षांमध्ये 2809 जणांचा अपघातात मृत्यू!

वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे गेल्या दहा वर्षांत 37,762 अपघात झाले आहेत. यात 16,597 जण जखमी झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident : वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे गेल्या दहा वर्षांत 37,762 अपघात झाले आहेत. यात 2809 जणांचा बळी गेला असून 16,597 जण जखमी झाले आहेत. यातील काहीजणांना अपंगत्व आले आहे. ही बाब गंभीर असून राज्य सरकारकडून अपघात टाळण्यासाठी रस्ता रुंदीकरणासह दुरुस्ती, दिशादर्शक फलकांची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. कारण यातील 90 टक्क्यांहून अधिक अपघात वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे झालेले आहेत, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे.

पणजीतील पर्यटन भवनमध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात राज्यातील अपघातांत बळी पडलेल्यांच्या 23 कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या मदत निधीची मंजुरी पत्रे देण्यात आली. गेल्या वर्षभरात 223 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 4 कोटी 16 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, वाहतूक संचालक राजेंद्र सातार्डेकर, वित्त आणि वाहतूक सचिव उपस्थित होते.

राज्यात 90 टक्क्यांपेक्षा जास्त अपघात हे ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह, अती वेग आणि निष्काळजीपणामुळे होतात हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने रस्ता रुंदीकरणाबरोबरच विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहकार्याने वाहतूक खाते येत्या महिन्याभरात सर्वत्र दिशादर्शक फलकांची निर्मिती करेल. मात्र, नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kidnapping Cases: दक्षिण गोव्यात काय चाललंय? 117 अल्पवयीन मुलांचे अपहरण; प्रेम प्रकरणातून पळून जाण्याच्या घटना वाढल्या

Omkar Elephant: 'ओंकार' हत्तीमुळे 31 शेतकऱ्यांना फटका, 'आधारनिधी' अंतर्गत मिळणार नुकसानभरपाई; अर्ज करण्याचे आवाहन

Ranji Trophy: 'करूण नायर' भिडणार गोव्यासोबत! रणजी संघाची कसोटी; बलाढ्य कर्नाटकविरुद्ध रंगणार लढत

Kelbai Gajlaxmi idol: वाळवंटी नदीत सापडलेली ‘ती’ मूर्ती 1000 नाही 20 वर्षांपूर्वीची! मूर्तिकार पुट्टास्वामींचा दावा

खडकात अडकलेली क्रूझ बोट, वार्का पॅराग्लायडिंग प्रकरणाची पर्यटन मंत्र्यांकडून गंभीर दखल; मालकांना नोटीस

SCROLL FOR NEXT