Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Election: गोवा निवडणुकीसाठी 3 पक्षांचे 27 उमेदवार! भाजपकडून सस्पेन्स कायम

रणधुमाळीला वेग : मुख्यमंत्री सावंत यांच्यासमोर काँग्रेसच्या धर्मेश सगलानींचे आव्हान

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकासाठीच्या उमेदवारी याद्यांचे वेध सर्वांनाच लागले असून कल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनी तब्बल 27 उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसची ही तिसरी यादी असून आपची चौथी यादी आहे. तर तृणमूलने पहिल्यांदाच आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. याशिवाय रिव्होल्युशनरी गोवन्स आणि गोवा फॉरवर्ड पक्षानेही उमेदवार जाहीर केले आहेत. सत्ताधारी भाजप आणि मगो पक्षाकडून मात्र अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. भाजपची यादी कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. (27 candidates from 3 parties for Goa elections)

काँग्रेसने (Goa Congress) आपल्या दुसऱ्या यादीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या साखळी मतदारसंघातून पुन्हा एकदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष धर्मेश सलगानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आतापर्यंत काँग्रेस पक्षाने 26 उमेदवार (Candidate) जाहीर केले होते.

त्यापैकी 2उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे त्यांचे 24 उमेदवार झाले आहेत. तर गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पक्षाने 2, आम आदमी पक्षाने 30, तृणमूल काँग्रेसने 11रिव्होल्युशनरी गोवन्स 28उमेदवार जाहीर केले आहेत. आज जाहीर केलेल्या याद्यांमधून लक्षवेधी ठरले ते मुख्यमंत्र्यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसतर्फे धर्मेश सलगानी यांचे नाव. दुसरीकडे, गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्या विरोधात तृणमूलने खासदार लुईझीन फालेरो यांना उमेदवारी देत मोठे आव्हान उभे केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT