गोव्यात पिण्याच्या पाण्यात सापडले 26 प्रकारचे प्लास्टिक Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पिण्याच्या पाण्यात सापडले 26 प्रकारचे प्लास्टिक

म्हापसा, पणजी, मार्शेल, मडगाव आणि काणकोण येथील पाण्याची चाचणी केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) पिण्यासाठी पुरविल्या जाणाऱ्या पाण्यात (Water) चक्क प्लास्टिकचे कण (Plastic particles) सापडत असल्याचा दावा टॉक्सीक्स लिंक (Toxics link) या निमशासकीय संस्थेने केला आहे. संस्थेचे सहयोगी संचालक डॉ. सतीश सिन्हा यांनी म्हापसा (Mapusa) येथे पाण्यात सर्वाधिक प्लास्टिक मिळाले असल्याचे म्हटले आहे. यावेळी शास्त्रज्ञ डॉ.महुआ सहा या उपस्थित होत्या. (26 types of plastics found in drinking water in Goa)

राज्यातील विविध ठिकाणी पाण्याची चाचणी केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. येथील इंटरनॅशनल सेंटरमधील एका सभागृहात टॉक्सीक्स लिंक या संस्थेने पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी डॉ. सिन्हा म्हणाले, राज्यातील प्रक्रियापूर्व पाण्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीकचे वेगवेगळे 26 प्रकाराचे कण आढळत आहेत, जे मानवी शरीराला अत्यंत धोकादायक आहेत. शिवाय समुद्रातील जलचरांनाही ते हानिकारक आहेत. संस्थेने म्हापसा, पणजी, मार्शेल, मडगाव आणि काणकोण येथील पाण्याची चाचणी केली. त्यात 5 ‘एमएम’ आकाराचे प्लास्टिकचे कण आढळले असून ते मानवी शरीराला अत्यंत घातक आहेत.

यापूर्वीदेखील राज्यातील कांही भागात पाण्याची तपासणी झाली होती, तेव्हा पाण्यात लोहखनिज सापडले होते. आता पुन्हा पाण्यात प्लास्टिकचे कण आढळत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे.

11 नमुन्यांतून तब्बल 288 प्लास्टिक कण

2.30 लाख घरांना राज्यात नळाद्वारे पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे याचे गांभीर्य वाढले आहे. एक लिटर पाण्यात सर्वाधिक 58 कण म्हापशात सापडले, त्यापाठोपाठ मार्शेलमध्ये 45, ओपा पाणी पुरवठा योजनेतील प्रक्रियापूर्ण पाण्यात 34, मडगाव येथे 32, पणजीत 31, अस्नोडा 28, काणकोण 15, सालेम 15, ओपा 07 कण सापडले असल्याचे डॉ. महुआ सहा यांनी सांगितले.

अशी झाली चाचणी

  • 11 पाण्याच्या नमुन्याची चाचणी करण्यात आली

  • म्हापसा, पणजी, मार्शेल, मडगाव आणि काणकोण येथील नळांचे पाणी चाचणीसाठी वापरण्यात आले.

  • प्रक्रियापूर्व आणि प्रक्रियेनंतरच्या पाण्याचे नमुने अस्नोडा, ओपा आणि सालेम पाणी पुरवठा केंद्रातून घेण्यात आले.

  • नळाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्यात फायबरचे कणदेखील आढळले आहेत.

"राज्यात नळाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा पूर्णतः सुरक्षित आहे. नमुने गोळा करताना पुरवठादार यंत्रणा म्हणून आमच्या समक्ष नमुने सील करून तटस्थ प्रयोगशाळेकडेही पाठवण्यात आलेले नाहीत."

- उत्तम पार्सेकर, प्रधान मुख्य अभियंता (सार्वजनिक बांधकाम)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT