Goa Accident
मडगाव: सध्या गाेव्यात ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली असून यावर्षी या प्रकरणांनी ५ हजारांची संख्या पार केली आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या ११ महिन्यांत राज्यात एकूण २,४३७ अपघातांची नाेंद झाली असून त्यात २५८ जणांचा बळी गेला आहे. यातील बहुतेक अपघातांची कारणे ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’शी निगडित असल्याचे सांगण्यात आले.
गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते ७ डिसेंबर या कालावधीत दक्षिण गोव्यात ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ची २,५८५ प्रकरणे नाेंद झाली आहेत, तर उत्तर गाेव्यात २,४२३ प्रक़रणांची नाेंद झाली आहे. मागच्या वर्षी हे प्रमाण दक्षिण गोव्यात ११०६ तर उत्तर गोव्यात ७२३ प्रकरणांची नाेंद झाली होती.
यंदा दक्षिण गोव्यात सर्वाधिक ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ची प्रकरणे वास्को पोलिस स्थानकात नाेंद झाली असून ही एकूण संख्या ६२५ एवढी आहे. त्यापाठाेपाठ फाेंडा (३५८) आणि काणकोणात (२८१) प्रकरणे नोंद झाली आहेत. उत्तर गाेव्यात सर्वांत जास्त ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ची प्रक़रणे कळंगुट (४३६) येथे नाेंद झाली असून त्यापाठाेपाठ म्हापसा (४१४) आणि पेडणेत (३६७) प्रक़रणांची नाेंद झाली आहे.
‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’मुळे रस्त्यांवर बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढली असून गोव्यात वाढलेल्या अपघातांमागे हेच मुख्य कारण असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.
१० हजारांचा दंड, तरीही
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांना पहिल्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये दंड असून ही चूक त्याने पुन्हा केली तर सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा कायद्यात नमूद केली आहे. तरीही या प्रकारांना आळा बसलेेला नाही.
गतवर्षीपेक्षा दुप्पट घटना
१ जानेवारी ते ७ डिसेंबर या कालावधीत गोव्यात ५००८ मद्यपी चालकांच्या विरोधात कारवाई केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण हाताबाहेर गेल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी १,८२९ प्रकरणांची नाेंद झाली होती.
कालावधी : १ जानेवारी ते ७ डिसेंबर
दक्षिण गोवा - २,५८५
उत्तर गोवा - २,४२३
कालावधी
१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर
अपघात - २,४३७
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.