Breast Cancer Symptoms Dainik Gomantak
गोवा

Breast Cancer: भीषण वास्तव! गोव्यात 1 लाखात 55 महिलांना स्‍तनाचा कर्करोग...

Breast Cancer: आता तिशीतही विळखा : 2500 जणींमध्‍ये आढळल्‍या स्‍तनात गाठी

दैनिक गोमन्तक

Breast Cancer: महिलांमध्‍ये स्तनाच्‍या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र समाधानाची बाब म्‍हणजे एक लाख महिलांची स्तन कर्करोग स्‍क्रिनिंग पूर्ण केलेले गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. या एक लाख महिलांपैकी अडीच हजार महिलांमध्ये कर्करोगसदृश गाठी आढळल्या.

त्यांच्‍यातील 1070 महिलांना पुढील चाचणीसाठी पाठविण्यात आले असून आत्तापर्यंत 55 महिलांना स्तन कर्करोग असल्याचे स्‍पष्‍ट झाले आहे. ‘युई लाईफ सायन्स’च्या सीईओ गौरी नवलकर-गोडसे यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना ही माहिती दिली.

या एक लाख महिलांची स्क्रिनिंग झाली नसती तर स्तन कर्करोग रुग्‍णांची संख्या निश्‍चितच वाढली असती. मग हे प्रमाण किती मोठ्या प्रमाणात वाढले असते हे सांगू शकत नाही. म्‍

हणूनच गोवा सरकार आणि आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्‍या सहकार्याने पार पडलेला हा उपक्रम महत्त्‍वपूर्ण आहे, असे गौरी नवलकर-गोडसे यांनी सांगितले.

‘युई लाईफ सायन्स’ ही राज्यात स्तन कर्करोग स्क्रिनिंग उपक्रमातील प्रमुख संघटना आहे. स्तन कर्करोगाची पहिल्या टप्‍प्‍यात माहिती मिळाल्यास केमो कमी होतो, केस गळत नाहीत व त्वचेवरही परिणाम होत नाही. सर्वसामान्य उपचारांप्रमाणे हे उपचार घेतले जाऊ शकतात, असे नवलकर यांनी सांगितले.

स्‍तन कर्करोगावरील सर्व उपचार मोफत

अगोदर स्‍तन कर्करोग हा 40 ते 45 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्‍ये आढळायचा. परंतु आता तिशीतही तो आढळत असल्‍याने आम्ही 30 वर्षे वयोगटापासूनच्या महिलांची स्क्रिनिंग करत आहोत, असे गौरी नवलकर-गोडसे यांनी सांगितले. दुसरी महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे गोव्‍यात स्‍तन कर्करोगावरील सर्व उपचार मोफत आहेत.

स्तन कर्करोग झालेल्या व्यक्तीला पहिल्या स्टेजमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून येत नाहीत. ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये दिसून येतात. त्यामुळे चाचणी करणे हाच एक पर्याय उरतो. महिलांनी वयाच्‍या तिशीनंतर वर्षातून किमान एकदा तरी स्तन कर्करोगाची चाचणी करणे गरजेचे आहे.
- गौरी नवलकर-गोडसे, सीईओ, युई लाईफ सायन्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT