Goa Police Cyber Fraud Operation Dainik Gomantak
गोवा

Cyber Fraud: अडीच कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश; गोवा पोलिसांची 11 राज्यांत कारवाई; 7 जेरबंद

2.5 Crore Cyber Fraud: सायबर गुन्हेगारांवर आणि आंतरराज्य वित्तीय फसवणूक करणाऱ्या रॅकेटवर झालेल्या कारवाईदरम्यान गोवा पोलिसांनी सात मुख्य संशयितांना अटक केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : सायबर गुन्हेगारांवर आणि आंतरराज्य वित्तीय फसवणूक करणाऱ्या रॅकेटवर झालेल्या कारवाईदरम्यान गोवा पोलिसांनी सात मुख्य संशयितांना अटक केली असून, २४ संशयितांना नोटिसा बजावल्या आहेत.

‘ऑपरेशन सायबर व्हिजिल’ या विशेष मोहिमेअंतर्गत गोवा पोलिसांनी देशातील ११ राज्यांमध्ये एकाच वेळी ही कारवाई केली. या छाप्यादरम्यान अनेक प्रकरणांमध्ये २ कोटी ५० लाख ६५ हजार ४०२ रुपये सायबर गुन्हेगारांनी लुटल्याचे उघड झाले.

गोवा सायबर क्राइम, उत्तर गोवा, दक्षिण गोवा, कुशावती जिल्हा पोलिस आणि गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती. गोव्यात नोंदवलेल्या सुमारे ४० वेगवेगळ्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांशी या कारवाईचा थेट संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सिंडिकेटशी काही संबंध आहे का?

आता पोलिसांनी सुमारे अडीच कोटी रुपयांच्या मोठ्या सायबर सिंडिकेटचा पर्दाफाश केला असला, तरी यात जप्त केलेली रक्कम किती आणि खर्च झालेली किती? आपल्या तक्रारीचा या सिंडिकेटशी काही संबंध आहे का? आणि मुख्य म्हणजे, गेलेले पैसे परत मिळतील का? असे अनेक प्रश्न पीडितांच्या मनात कायम आहेत.

नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी ४० पथके

सायबर गुन्हेगारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी गोवा पोलिसांनी ४० विशेष पथके तयार केली होती. या पथकांनी देशभरातील ११ राज्यांमधील ४० हून अधिक ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा, दिल्ली, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक आणि आसाम यांचा समावेश आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अंतर्गत २४ संशयितांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संशयितांकडून डिजिटल पुरावे आणि गुन्ह्यात वापरलेली २१ इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करण्यात आली असून, ती न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT