Court Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: बनावट दाखले तयार करुन जमीन विक्री, 2.20 कोटींच्या फसवणुकीचा आरोप; संयिताला जामीन नाकारला

Goa Fraud Case: आर्थिक गुन्‍हे विभाग पोलिसांनी एकूण चार जणांवर फसवणुक व अफरातफरीचा गुन्‍हा नोंद केला आहे.

सुशांत कुंकळयेकर

Goa Fraud Case

बनावट कागदपत्रे तयार करुन नुवे येथील भलत्‍याच्‍याच मालकीची सुमारे 19 हजार चौ.मी. मेसर्स महेंद्र जैन या आस्‍थापनाला विकून त्‍याना 2.20 कोटींचा गंडा घालण्‍याचा आरोप असलेल्‍या आग्‍नेल डिसाेझा याने जामिनासाठी केलेला अर्ज मडगावच्‍या प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी टी. जी. मास्‍करेन्‍हास यांनी फेटाळून लावताता संशयिताच्‍या पोलीस कोठडीचा रिमांड आणखी तीन दिवसांनी वाढवून दिला.

या प्रकरणातील अन्‍य एक संशयित असलेली आग्‍नेल डिसोझा याची पत्‍नी मॅकलीन परेरा हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून हा अर्ज आता दक्षिण गोवा सत्र न्‍यायालयासमोर सुनावणीस येणार आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्‍हे विभाग पोलिसांनी एकूण चार जणांवर फसवणुक व अफरातफरीचा गुन्‍हा नोंद केला आहे.

या प्रकरणी जीत जैन याने तक्रार दिली हाेती. संशयितांनी बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन कागदपत्रे तयार केली आणि भलत्‍याचीच जमीन आपल्‍याला विकण्‍याच्‍या उद्देशाने आपल्‍याकडून 2.20 काेटी रुपये घेतले असे म्‍हटले होेते. याप्रकरणी सुरुवातीला मायणा-कुडतरी पोलिसात तक्रार नोंद केली हाेती. नंतर हे प्रक़रण आर्थिक गुन्‍हे विभागाकडे सोपविण्‍यात आले होते.

काल हा जामीन अर्ज सुनावणीस आला असता संशयिताने बनावट दाखले व बनावट शिक्‍का कुठे तयार केला हे पाेलिसांना शाेधून काढायचे आहे. संशयित याबाबत पोलिसांना सहकार्य करत नाही त्‍यामुळे पोलीस कोठडीत ठेवून त्‍याच्‍याकडून माहिती काढून घ्‍यायची असल्‍याचे तपास अधिकार्‍यांनी सांगितले.

या प्रकरणी तक्रारदार जैन याच्‍यावतीने हस्‍तक्षेप याचिका दाखल केल्‍याचे ॲड. प्रितम माेराईस यांनी या जामिनाला विरोध करताना हा गंभीर स्‍वरुपाचा गुन्‍हा असून त्‍यात मोठी रक्‍कम अडकली आहे असा दावा करुन ही रक्‍कम संशयिताने स्‍वत: हडप केली आहे असा दावा केला.

न्‍या. मास्‍कारेन्‍हस यांनी हा दावा उचलून धरताना, हा गंभीर स्‍वरुपाचा गुन्‍हा असल्‍याने तसेच त्‍यात मोठी रक्‍कम गुंतलेली असल्‍याने आरोपीप्रती कुठलीही दया दाखविता येणे शक्‍य नाही असे नमूद करत हा जामीन अर्ज फेटाळून लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT