Pramod Sawant, Sadanand Tanavade, Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: 2027 ला 'भाजप'च येणार, मुखमंत्रीपदाची स्वप्ने बघू नका; प्रमोद सावंत यांचा विरोधकांवर घणाघात

Goa BJP: भाजपच्या दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर गावकर यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री मडगाव येथे आले असता त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले.

Sameer Panditrao

मडगाव: संघटन आणि कार्यकर्ते यांच्या जोरावर २०२७ च्या निवडणुकीत गोव्यात भाजपच पुन्हा सत्तेवर येणार असून मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे नक्की आहे. त्यामुळे विरोधकांमधील जे कोणी आताच मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहात आहेत त्यांनी ती पाहणे बंद करावे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

भाजपच्या दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर गावकर यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री मडगाव येथे आले असता त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले.

२०२७ च्या निवडणुकीची अर्धी तयारी पूर्ण

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले की, भाजप हा कार्यकर्त्यांना सतत कार्यक्रम देणारा पक्ष असून राज्यातील संघटन बांधणी ही २०२७ ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सुरू केली आहे. पक्ष निवडणुकीमुळे पुढच्या निवडणुकीची ५० टक्के तयारी आताच पूर्ण झाली आहे, असे ते म्हणाले.

नाव न घेता सरदेसाईंवर टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांनी आमदार विजय सरदेसाई यांचे नाव न घेता, इथे जवळ असलेल्या आमदाराला आताच आपण मुख्यमंत्री होणार, अशी स्वप्ने पडू लागली आहेत; पण सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढविली तरी भाजपच बाजी मारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस पुन्हा कधीच सत्तेवर येऊ शकत नाही, हे महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांतील निवडणूक निकालांनी स्पष्ट केले आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT