Bihar Politics: तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात! बिहारमध्ये काय घडतंय?

Muslim Appeasement Politics In Bihar: लालू यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) बिहारमधील सीमांचल भागात मुस्लिम राजकारणाला अधिक हवा दिली आहे.
Bihar Politics: तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात! बिहारमध्ये काय घडतंय?
Muslim Appeasement Politics In BiharDainik Gomantak
Published on
Updated on

Muslim Appeasement Politics In Bihar: लालू यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) बिहारमधील सीमांचल भागात मुस्लिम राजकारणाला अधिक हवा दिली आहे. अनेक अहवाल सूचित करतात की, गेल्या काही वर्षांमध्ये या भागात मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. अंशतः बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरीमुळे, ज्यामुळे किशनगंज, अररिया, कटिहार आणि पूर्णिया सारख्या जिल्ह्यांमध्ये लक्षणीयरित्या लोकसंख्येत बदल झाला आहे. अशा घटनाक्रमांमुळे प्रदेशाच्या सामाजिक-राजकीय स्थिरतेसोबतच राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो.

एकतेला धोका

इतिहासकार ज्ञानेश कुदासिया यांनी स्पष्टपणे सांगितले की, बांगलादेशात फाळणीच्या वेळी हिंदूंची लोकसंख्या 42 टक्के होती जी आता 2022 पर्यंत केवळ 7.95 एवढी राहीली आहे. सीमांचलमध्ये सुरु असलेले तुष्टीकरण बिहारला त्याच दिशेने घेऊन जाऊ शकते, ज्यामुळे भारताची एकता धोक्यात येऊ शकते.

Bihar Politics: तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात! बिहारमध्ये काय घडतंय?
Bihar Governor: 'डाव्या विचारसरणीचे होते नेहरु व त्यांचे मंत्री, असे लोक भारताचा विचार कसा करणार?'; बिहारचे राज्यपाल

आरजेडी, काँग्रेस आणि एआयएमआयएममध्ये चुरशीची लढत

सीमांचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 40-70 टक्के आहे, ज्यामध्ये किशनगंजची लोकसंख्या सर्वाधिक आहे. या बदलामुळे आरजेडी, काँग्रेस आणि एआयएमआयएम या प्रदेशात वर्चस्वासाठी स्पर्धा करु लागले असून मुस्लिमबहुल मतदारसंघांवर जास्त अवलंबून आहेत.

दुसरीकडे, लालू कुटुंबीय आपल्या निवासस्थानी इस्लामिक विधी, कार्यक्रमांचे आयोजन करतात, जेणेकरुन मुस्लीम समुदायाशी त्यांचे संबंध अधिक दृढ होतील.

पाकिस्तान निर्मिती

फाळणी आणि बांगलादेश (Bangladesh) मुक्ती संग्रामादरम्यान बिहारच्या मुस्लिमांनी वादग्रस्त भूमिका बजावल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ मिळतात. सिंध असेंब्लीच्या एका सदस्याच्या अलीकडील टिप्पणीने या दाव्यांना पुष्टी दिली. त्याने आपल्या भाषणादरम्यान पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये मूळच्या बिहारच्या मुस्लिमांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला होता.

Bihar Politics: तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात! बिहारमध्ये काय घडतंय?
Bihar: लवकरच मिळणार होती गुड न्यूज, गरोदर बायकोला भेटण्यासाठी गावी गेलेल्या तरुणाला ट्रॅक्टरने चिरडले

CAA ला विरोध

RJD आणि त्याच्या मित्रपक्षांची तुष्टीकरणाची धोरणे नागरिकत्व सुधारणा कायद्यासारख्या (CAA) सुधारणांनादेखील विरोध करतात, ज्याचा उद्देश छळलेल्या अल्पसंख्याकांचे संरक्षण करणे आहे. दरम्यान, बांगलादेशात हिंदूंच्या दुर्दशेकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. आपली मुस्लिम व्होट बॅंक कशी शाबूत राहिल याचा हा विचार हे पक्ष करतात.

सांप्रदायिक असमतोल

बिहारमध्ये आरजेडीचा प्रभाव असणाऱ्या भागात हिंदू धार्मिक कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आणल्याच्या बातम्या, जसे की, सरस्वती पूजा मिरवणुकांवर हल्ले, सीमांचलमधील काही शाळांमध्ये शुक्रवारची सुट्टी जाहीर करण्यासारख्या घटनांमुळे या प्रदेशातील वाढत्या सांप्रदायिक असमतोलाची चिंता आणखी वाढली आहे. अशा घटनांमुळे बांगलादेशशी तुलना करणे अपरिहार्य बनले आहे, जिथे हिंदू अल्पसंख्याकांना छळ सहन करावा लागतो. समीक्षकांनी चेतावणी दिली आहे की, सीमांचलमधील अनियंत्रित तुष्टीकरणामुळे अशीच परिस्थिती उद्भवू शकते, ज्यामुळे या प्रदेशाची सामाजिक बांधणी आणि भारताचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते.

Bihar Politics: तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात! बिहारमध्ये काय घडतंय?
Bihar: बिहारमध्ये संपूर्ण कुटुंब जिवंत जाळले, पती, पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू; झोपेत असताना घराला लागली आग

राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणार की...

बिहारमधील (Bihar) परिस्थिती ही व्होट बँकेच्या राजकारणाच्या धोक्याची आणि राष्ट्रीय एकात्मता अस्थिर करण्याच्या संभाव्यतेची स्पष्ट आठवण करुन देणारी आहे. तुष्टीकरणाची धोरणे प्राधान्यक्रमित होत असताना, प्रश्न एवढाच उरतो की, बिहारचे नेतृत्व राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणार की धोकादायक मार्गावर चालणार?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com