Dharbandora Accident Dainik Gomantak
गोवा

Dharbandora Accident: ट्रकची धडक चुकवायला गेला अन् भयंकर घडलं; अपघातात 20 वर्षीय तरूणाचा मृत्यू, एकजण गंभीर

Dharbandora: धारबांदोडा परिसरात रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात किर्लपाल येथील तुषार नाईक (वय २०) याचा जागीच मृत्यू झाला.

Sameer Amunekar

धारबांदोडा परिसरात रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात किर्लपाल येथील तुषार नाईक (वय २०) याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र अभिषेक गावकर (वय २०, किर्लपाल) हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर मालवाहू ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार आणि अभिषेक हे दोघे दुचाकीवरून देवसडा- धारबांदोडा पुलाजवळून जात असताना समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकची धडक चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरली.

यात तुषारला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. अभिषेकला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातानंतर ट्रक चालकाने वाहनासह पळ काढला असून पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. ट्रक चालकाचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात आलीय.

पोलिसांकडून ट्रकचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी चालकाचा शोध घेतला जाणार असल्याचे सांगितलं जात आहे.

याआधी, गुरूवारी धारबांदोडा येथील बंद पडलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात कार आणि दुचाकीची धडक झाल्याची घटना घडली होती. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दुचाकी चालक जखमी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वाराने अचानक कारला जोरदार धडक दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT