Sonsodo Garbage Issue Dainik Gomantak
गोवा

Sonsodo Garbage Issue: सोनसडोचा 20 टन कचरा आता काकोडा प्रकल्पाकडे; उच्च न्यायालयाचे निर्देश

दैनिक गोमन्तक

Sonsodo Garbage Issue: कचरा विल्हेवाटीची राज्यात गंभीर समस्या आहे. सोनसडो येथील कचरा समस्या ही त्यापैकी एक असून गेली अनेक वर्षे हा रखडलेला असून तो धोकादायकही बनला आहे. त्यामुळे मडगाव पालिका क्षेत्रात दरदिवशी जमा होणाऱ्या ३५ मेट्रिक टनपैकी २० मेट्रिक टन कचऱ्यावर काकोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात प्रायोगिक तत्त्वावर १ सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज दिले.

नगरपालिका प्रशासनाने ११ जुलै रोजी काढलेल्या आदेशानुसार मडगाव पालिकेने इतर निर्देशांची अंमलबजावणी करावी, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे.

हल्लीच विधानसभेत दिलेल्या माहितीत काकोडा येथील कचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प हा पूर्णत: तयार असून तो उद्‍घाटनाअभावी सुरू केलेला नाही. तेथे प्रायोगिक तत्त्वावर चाचणी झाली आहे.

दररोज सुमारे १०० मेट्रिक टन कचरा विल्हेवाटीची या प्रकल्पाची क्षमता आहे. मडगावच्या दैनंदिन ३५ टन ओल्या कचऱ्यापैकी ३० टन कचरा साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेण्यात येत आहे. साळगावपेक्षा काकोडा कचरा प्रक्रिया प्रकल्प मडगावला जवळ आहे आणि तेथे तो नेण्यास सोयीस्कर होणार आहे. सोनसोडो येथे असलेल्या कचऱ्याला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यावर मडगाव पालिका तोडगा काढेल, असे खंडपीठाला सांगितले.

वाहतूक खर्च पालिकेने द्यावा

मडगावचा २० मेट्रिक टन कचरा राज्य कचरा व्यवस्थापन मंडळ काकोडा येथे नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था करील. मात्र, पालिकेला वाहतुकीचा खर्च द्यावा लागेल. उर्वरित १० टन कचरा साळगावला नेण्यात येणार आहे, तर ५ टन कचऱ्याची पालिका कचरा व्यवस्थापन केंद्रात विल्हेवाट लावली जाईल.

कचरा प्रकल्पाचे उद्‌घाटन कधी?

राज्‍य कचरा व्यवस्थापन महामंडळाने मडगाव पालिकेचा कचरा २० मेट्रिक टन कचरा ३१ ऑगस्टपासून काकोडा येथे नेण्यास सुरुवात करावी. त्यामुळे काकोडा प्रकल्प १ सप्टेंबरपासून सुरू होईल. काकोडा कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्‍घाटन सरकारने त्यांच्या सोयीनुसार करावे, असे खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT