Hindu Deities Criticism in Goa Dainik Gomantak
गोवा

युपीत अतिकची हत्या! गोव्यात दोन शाळकरी मुलींची हिंदू देवतांविरोधात पोस्ट; गुन्हा दाखल

संबंधित घटनेबाबत सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे.

Kavya Powar

Hindu Deities Criticism in Goa: स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या देशात जात, धर्मभेद दिसून आला आहे. प्रामुख्याने देशाच्या फाळणीनंतर हिंदू आणि मुस्लिम धर्मातील भेदभाव इतका वाढला की आजतागायत या गोष्टींमुळे देशात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.

असाच एक धक्कादायक प्रकार गोव्यातील एका शाळेत घडला आहे. शाळेत शिकणाऱ्या दोन मुस्लिम मुली हिंदू विद्यार्थ्यांना आणि एकंदरीत हिंदू धर्म, इतिहास आणि देवतांचा अपमान करत विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

असे आहे संपूर्ण प्रकरण...

माहितीनुसार, गोव्यातील एका शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेत शिकत असलेल्या सारा आणि साझिया या दोघी बहिणी त्यांच्यासोबत शिकत असलेल्या काही हिंदू विद्यार्थ्यांना धर्म, इतिहास आणि हिंदू देवतांवरून अपमानकारक गोष्टी बोलून त्रास देत होत्या, असे बोलले जात आहे.

याबाबत त्यांनी अनेक अश्लील आणि अपमानजनक गोष्टी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेयर केल्या असून त्याचे स्क्रीनशॉट सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत.

अश्लील पोस्ट करत त्यांनी शिवलिंगाचा उघडपणे अपमान केल्याचा आरोप होत आहे. तसेच इतिहासात नोंद असल्याप्रमाणे इस्लामिक राज्यांनी त्यावेळी हिंदू महिलांवर केलेल्या अत्याचाराचा उल्लेख करून पोस्ट करत, त्या कृत्याचे समर्थनही केले असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, दोघी बहीणींच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यातील एक अकाऊंट सक्रिय नसल्याचे दिसून आले.

सोशल मिडियावरून दोघी बहीणींनी केला हिंदू देवतांचा अपमान; पहा फोटो

पोस्ट व्हायरल झाल्यानंतर या संपूर्ण घटनेची दाखल घेत उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक यांनी या दोन मुलींवर गुन्हा नोंद केला आहे. कलम 153-ए r/w 34 आयपीसी आणि आयटी कायद्याच्या कलम 67 अन्वये गुन्हा नोंद करून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

संबंधित घटनेबाबत सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे.   

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वडिलांनी फोन काढून घेतला, मुलाचा संताप अनावर; मोबाईलच्या वेडापायी उचललं 'चुकीचं पाऊल'

आईचा आदर न करणारा व्यक्ती भारतमातेचा काय आदर करणार? राहुल गांधी आई सोनिया गांधींवर ओरडायचे; विश्वजीत राणेंनी सांगितला किस्सा

फिश मिल प्लांटला कुंकळ्ळी पालिकेचा नकार, सरकारने दुर्लक्ष केल्यास थेट आंदोलनाचा इशारा; LoP युरी

Nepal PM Resigned: केपी शर्मा ओली यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, Gen-Z च्या हिंसक आंदोलनानंतर नेपाळमध्ये सत्तांतर

Marcus Stoinis Engagement: मार्कस स्टॉइनिस साराच्या प्रेमात, भर समुद्रात दोघांनी एकमेकांना केलं प्रपोज, पाहा रोमँटिक PHOTOS

SCROLL FOR NEXT