Uma Patil Arrested Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: 'पतीला सरकारी नोकरीला लावते' सांगत दोघांना गंडा, उमा पाटीलला अटक

Cash For Job Scam Goa: पतीला सरकारी नोकरीला लावते सांगून चार लाखांना गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस.

गोमन्तक डिजिटल टीम

Cash For Job Scam Goa

म्हापसा: तुमच्या पतीला सरकारी नोकरीला लावते, अशी थाप मारून तब्बल ४ लाख रुपये उकळल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी बायणा-वास्को येथील उमा पाटील हिला आज बुधवारी (ता. २७) अटक केली. याप्रकरणी नादोडा येथील ४४ वर्षीय महिला फिर्यादी आहेत.

ही फसवणुकीची घटना गेल्या ऑगस्ट २०२३ मध्ये घडली होती. तुझ्या पतीला कुठल्या तरी सरकारी खात्यात नोकरीला लावतोच, असे संशयित उमा हिने फिर्यादीला सांगितले होते. मात्र संशयिताने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिस तक्रार दिली होती. कोलवाळ पोलिसांनी १४ नोव्हेंबरला याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता.

मडगावात जोडप्याकडून १४.५० लाखांना गंडा

सरकारी नोकरी देण्याचे आमिष देऊन एका जोडप्याने आम्हाला साडेचौदा लाखांना गंडा घातल्याचे दोन महिलांनी मडगाव स्थानकात येऊन सांगितले.

यावेळी पोलिसांनी त्यांना जेथे घटना घडली आहे, तेथील पोलिस स्थानकात जाऊन तक्रार नोंदविण्यास सांगितले. संशयित म्हणून त्यांनी रोहित पै व त्याच्या बायकोने आम्हाला फसविल्याचे सांगितले. आमचे पैसे परत देण्यासाठी जो धनादेश दिला होता, तो वठलाच नाही. दरम्यान, रोहितचे आजारपणामुळे निधन झाले असून त्याची पत्नी आमचे पैसे देण्यास नकार देत असल्याचे या तक्रारदारांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT