Financial fraud Dainik Gomantak
गोवा

Pernem Financial Fraud: पेडणे कार्यालयातील ‘अबकारी’चा तब्बल 'एवढ्या' कोटींचा गफला उघड

राजकीय वरदहस्त : पेडण्यातील कर्मचाऱ्यास निलंबित न करता वाळपईत बदली

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem Financial Fraud: अबकारी खात्याच्या पेडणे कार्यालयात किमान दोन कोटींचा गैरव्यवहार झाला असून या प्रकरणात संशय असलेल्या कर्मचाऱ्यास निलंबित न करता त्याची वाळपई येथे बदली केल्याने त्याला जबरदस्त राजकीय वरदहस्त लाभला असल्याची चर्चा आहे.

पेडणे अबकारी विभागाकडून कायम व तात्पुरत्या मद्यालयांना यापूर्वीच अबकारी परवाने मिळाले आहेत. मात्र, अबकारी शुल्क भरले नसल्याच्या नोटिसा मिळाल्यानंतर आज त्यांना पेडणे कार्यालयात बोलाविण्यात आल्यानंतर हा गफला उघडकीस आला!

अबकारी आयुक्त नारायण गाड यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना हा गफला घडल्याचे मान्य करून हा प्रकार २०१८ ते २०२० या काळात घडल्याची माहिती दिली.

या प्रकरणात पेडणे अबकारी कार्यालयातील हरीश प्रभाकर नाईक या कर्मचाऱ्यावर पैशांची अफरातफर केल्याचा संशय असून त्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

या कार्यालयातील अबकारी निरीक्षक व इतर अधिकारीही सामील असल्याशिवाय हा एवढा मोठा गफला घडणेच शक्य नाही, अशी माहिती प्राप्त झाली.

या प्रकरणात कार्यालयाच्या तिजोरीत निधी न भरता तो परस्पर लाटण्यात आला, परंतु खात्याचा शिक्का मारून मद्यालयांना परवानेही देण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यालयातील सर्वच प्रमुख अधिकारी त्यात सामील असण्यावर शिक्कामोर्तब होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

गाड यांच्या मते, अद्याप तरी प्राथमिक चौकशीत एकाच कर्मचाऱ्याकडे संशयाची सुई वळत असून त्याची बदली करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.

‘‘जर शुल्क भरले नसेल तर खात्याने आम्हाला परवाने कसे दिले?’’ असा सवाल या मद्यालयांच्या चालकांनी केला असून गेले काही दिवस या प्रश्‍नावरून विभागांतर्गत चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली. या चौकशीत इतर अनेक घोटाळेही उघडकीस येण्याची शक्यता आहे.

काही मद्यालयांना तर बँकेत पैसे भरले असल्याचे शिक्केही प्राप्त झाले असून त्यामुळे सुरुवातीला अबकारी खात्यातही गोंधळ माजला होता. बँकेचा शिक्का मारण्याचाही प्रकार घडल्याने या प्रकरणात एक टोळीच गुंतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

एका शॅकवाल्याने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, अनेकदा पेडणे अबकारी खात्यातील काऊंटरवर आल्यावर डिजिटल नोंदणी शक्य नाही, अशी सबब इंटरनेटच्या अभावामुळे सांगितली जायची, त्यातून हा प्रकार अनेक दिवस उघडकीस आला नव्हता.

2022-2022 च्या अबकारी परवान्यांमध्येही हा गोलमाल मोठ्या प्रमाणात घडला आहे. यासंदर्भात अबकारी आयुक्त नारायण गाड म्हणाले की, अनेकांना ऑनलाईन पैसे भरणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी आम्ही चलन तयार करतो व त्यांनी परस्पर पैसे बँकेत भरून ते चलन आम्हाला दिल्यानंतर आम्ही त्याला परवाना देतो.

मी खात्यांतर्गत एक ऑडिट विभाग तयार केला होता व त्यांना प्रत्येक विभागात जाऊन तपासणी करायची होती. ते पेडणे कार्यालयात तपासणी करीत असताना हा गफला उघडकीस आला.

...आणि मामला उघडकीस आला

‘‘पेडणे अबकारी विभागात ज्यांची कायमस्वरूपी बांधकामे आहेत, त्यांना मद्य परवाना मिळविण्यासाठी 50 हजार तर तात्पुरत्या शॅक्ससारख्या आस्थापनांना 25 हजार रुपये शुल्क भरावे लागते.

त्या सर्वांना खात्याकडून शुल्क न भरल्याच्या नोटिसा आल्यानंतर आज, बुधवारी कार्यालयात बोलावून घेण्यात आले होते. त्यामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला आणि हा मामला उघडकीस आला’’, अशी माहिती एका शॅकचालकाने या प्रतिनिधीला दिली.

बनावट स्टॅम्पचा वापर

एका महिलेने तर 25 हजार शुल्काऐवजी केवळ 20 हजार रुपये भरले असतानाही तिला अबकारी परवाना प्राप्त झाला आहे. यावरून केवळ बनावट स्टॅम्प वापरून असे परवाने तयार केले जात होते व त्यावर निरीक्षकांची सही केली जायची, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. अशा सर्व अबकारी परवान्यांवर खात्याचा ‘परवाना क्रमांक’ही व्यवस्थितपणे नोंदविण्यात आला आहे, हे विशेष!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT