Madgaon Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic: बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा फटका; मडगावातून तब्बल 2 कोटी 23 लाख रुपयांची दंड वसुली

Madgaon Traffic Police: मडगाव वाहतूक पोलिसांच्या या सदर मोहिमेच्या माध्यमातून अपघातांवर आळा बसवणे आणि रस्तासुरक्षेला प्राधान्‍य देण्‍यात येत आहे

Akshata Chhatre

सासष्टी: रस्त्यावर बेशिस्तपणे गाडी चालवणाऱ्यांवर आळा बसवण्यासाठी गोवा वाहतूक पोलिसांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्‍यांच्‍या कालावधीत मडगावातून तब्बल २ कोटी २३ लाख रुपयांचा दंड वसूल केला. तर, ३ हजार ६६५ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

मडगाव वाहतूक पोलिसांच्या या सदर मोहिमेच्या माध्यमातून अपघातांवर आळा बसवणे आणि रस्तासुरक्षेला प्राधान्‍य देण्‍यात येत आहे.

मडगाव वाहतूक पोलिसांची वाहतूक नियम उल्लंघनावर करडी नजर असून आत्तापर्यंत त्यांनी नो-एंट्री झोनमध्ये वाहन चालवण्याची १०,२८८ प्रकरणे, बेशिस्‍त पार्किंगची ९९७८ प्रकरणे, विनाहेल्मेट दुचाकी चालवण्याची ३१८७ प्रकरणे, अतिवेगाने वाहन चालवण्याची १८७० प्रकरणे तर दारू पिऊन वाहन चालविल्‍याच्या ५६२ प्रकरणांची नोंद केली आहे.

ही आकडेवारी रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि बेशिस्‍त वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करते. नो-एंट्री उल्लंघनाच्या दहा हजारांहून अधिक प्रकरणांवर आणि बेशिस्‍त पार्किंगच्या जवळपास दहा हजार प्रकरणांवरून वाहतूक नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे प्रशासनाने अधोरेखित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT