Goa Drugs Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Seized: म्हापशात ड्रग्स तस्करीप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक; 1.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी 1. 90 लाखांचे 18.40 ग्रॅम मेंटाफेटामाईन ड्रग्स जप्त करण्यात आले

दैनिक गोमन्तक

गोव्यात वाढत्या गुन्हेगारी प्रकारांवर आळा घालण्यासाठी गोवा सरकार, पोलीस प्रशासन आणि अबकारी खाते नेहमीच सतर्क असते मात्र तरीही हे प्रकार कमी होण्याचे नाव घेत नाहीत. प्रामुख्याने ड्रग्स तस्करीच्या घटनांमुळे गोव्याचे नाव देशभरात खराब होत आहे.

यामध्ये परप्रांतीयांचा सहभाग जास्त असतो; मात्र आता अल्पवयीन मुलांचाही यामध्ये सहभाग असल्याचे प्रकार समोर येत आहेत. नुकतेच पोलिसांनी म्हापसा येथे छापा टाकून एकाला अटक केली आहे.

म्हापसा येथील डांगी कॉलनी येथे 19 वर्षीय तरुणाला ड्रग्स तस्करी प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. संशयिताचे नाव अफनान घोरी असून त्याच्याकडून पोलिसांनी 1. 90 लाखांचे 18.40 ग्रॅम मेंटाफेटामाईन ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.

संबंधित घटनेबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, गोव्यातून कर्नाटकात मद्य तस्करी करण्याचा प्रयत्नात असलेल्या एका ट्रक चालकाला बुधवारी रात्री अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

अनमोड तपासणी नाका येथे ही कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akshat Naik Death Case: 'अक्षत' मृत्यूप्रकरणी नव्याने तपास करा, वडिलांची पोलिसांत तक्रार, पुरावे लपविल्याचा आरोप

Monsoon Tourism: सोशल मीडियासाठी रिल्स, सेल्फीचा नाद घेतो जीव! पावसाळी पर्यटनाचा मुद्दा बनला जटिल; धारबांदोड्यात 17 धोकादायक स्थळे

Karapur Sarvan Sarpanch: कारापूर-सर्वण सरपंच निवडीसाठी मंगळवारी बैठक, बिंदिया सावंत यांचे नाव निश्‍चित तरी उत्सुकता

Goa Monsoon: पावसाचा 20 इंचांचा टप्पा पार, मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम; रविवारी 1 इंच पावसाची नोंद

खरी कुजबुज: काँग्रेस व भाजप अंतर्गत वादाच्या भोवऱ्यात!

SCROLL FOR NEXT