Missing Satara Girl Found In Goa Dainik Gomantak
गोवा

Margao Police: साताऱ्यातून केरळला जाणारी 18 वर्षीय बेपत्ता तरुणी गोव्यात सापडली; ट्रेन प्रवासात झाली होती चुकामूक

Missing Satara Girl Found In Goa: पायल अचानक बेपत्ता झाली. तिच्या घरच्यांनी सातारा पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली होती.

Pramod Yadav

Missing Satara Girl Found In Goa

मडगाव: साताऱ्यातून रेल्वेने केरळला जाणारी १८ वर्षीय बेपत्ता तरुणी गोव्यात आढळली आहे. मडगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना आज (१४ डिसेंबर) बेपत्ता तरुणी आढळून आली. तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा पोलिसांत दाखल करण्यात आली होता.

पायल सुहास माने (वय १८, रा. मानेवाडी, सातारा, महाराष्ट्र) असे सापडलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सातारा पोलिस स्थानकात १३ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. पायल सापडल्यानंतर सातारा पोलिसांना याबाबत कळविण्यात आले आहे.

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल सुबेश सुलोचना (रा. सातारा, मूळ कोझिकोड, केरळ) याच्यासोबत मत्यगंधा एक्सप्रेस ट्रेनमधून केरळला जात होती. ट्रेन प्रवासादरम्यान, पायल अचानक बेपत्ता झाली. तिच्या घरच्यांनी सातारा पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, बेपत्ता तरुणी मडगाव पोलिसांना आढळून आली असून, याबाबत सातारा पोलिसांना कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT