corona possitive 
गोवा

चोवीस तासांत १७४ पॉझिटिव्‍ह

Tejshri Kumbhar

तेजश्री कुंभार

पणजी : कोरोनाची राज्यातील स्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. गुरुवारी राज्यात १७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याची माहिती गोवा आरोग्य खात्याने दिली. आजच्या दिवशी ११४ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर कोरोनाबाधितांची संख्‍या १६६६ एवढी आहे. दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४३५० झाली असून आजवर २६५५ रुग्ण बरे झाल्याची माहिती देण्यात आली. आज केलेल्‍या चाचण्यांपैकी ५४७६ इतके अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती गोवा आरोग्य खात्याने दिली.

गेल्या चोवीस तासांत ३०१३ जणांच्या कोविड पडताळणी चाचण्या करण्यात आल्या, तर १९५७ जणांचे अहवाल हाती आले आहेत. आजच्या दिवशी ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहितीही मिळाली. आजच्या दिवशी २६ देशी प्रवाशांना आणि ६८ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ३६ जणांना ठेवण्यात आले.

रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले १३२ रुग्ण आहेत. डिचोलीत ३ रुग्ण, साखळीत ९१, पेडणेत २६, वाळपईत ७, म्हापसा ६३, पणजीत ३५, बेतकी येथे १३, कांदोळीत २१, कोलवाळ ४३, खोर्ली २५, चिंबलमध्‍ये ८७, पर्वरीत २२, कुडचडेत ६, काणकोणात ६, मडगावात ७२, वास्कोत ३७३, लोटलीत २४, मेरशी येथे ८, केपेत ११, सांगेत १, शिरोडा येथे ९, धारबांदोड्यात ४२, फोंडा ४९, आणि नावेलीत १८ रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली. विविध ठिकाणी सुविधायुक्त क्वारंटाईनमध्ये ५२ जण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

सांताक्रूझ येथील डॉक्टरला कोरोना

सांताक्रूझ येथील अस्‍थिरोगतज्‍ज्ञाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली. त्‍या डॉक्‍टरने गेल्या काही दिवसांत काही रुग्णांवर उपचार केले होते. हा डॉक्टर दिवसाला शेकडो रुग्णांवर उपचार करतात. त्‍यामुळे त्‍यांच्‍या संपर्कातील लोकांची संख्‍या जास्‍त आहे. सध्या या डॉक्टरवर उपचार करण्यासाठी त्यांना ‘फॅसिलिटी’ विभागात ठेवले आहे.

- महेश तांडेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; भाजपचे माजी आमदार 'आप'च्या संपर्कात?

Goa Cabinet Expansion: रमेश तवडकर आणि दिगंबर कामत 'शपथबद्ध'! वर्षभर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पूर्ण

Mumbai Cricket: मुंबई क्रिकेटमध्ये खळबळ! कर्णधारपदाचा राजीनामा दिला, खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिला धक्का

Digambar Kamat: सातवेळा मडगावातून विजयी, 2007 ते 2012 काळात मुख्यमंत्रिपदी; दिगंबर कामत यांची चढ-उताराची वाटचाल

Mandovi River Cruise Sink: किनाऱ्यावर नांगरलेल्या बोटीत शिरलं पाणी, मांडवी नदीत 'क्रूझ' बुडाली; राज्यात पावसाचं थैमान

SCROLL FOR NEXT