Anjuna police investigation into teen death Dainik Gomantak
गोवा

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

17 Year Old boy Death in Nagwa Goa: डायसवाडो, नागवा येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: डायसवाडो, नागवा येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मूळचा उत्तर प्रदेश येथील असलेला हा मुलगा सलूनमध्ये काम करत होता. एका मैत्रिणीसोबतच्या संबंधांतील तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय हणजूण पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.४९ च्या सुमारास स्थानिक नागरिक यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी १७ वर्षीय मुलगा घरातील छताच्या पंख्याला नायलॉनच्या दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. १०८ रुग्णवाहिकेच्या वैद्यकीय पथकाने तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

घातपात नव्हे, मानसिक तणाव

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. प्राथमिक चौकशीत हा मुलगा हेअर कटिंग सलूनमध्ये कामाला होता आणि एका मैत्रिणीशी असलेल्या संबंधांवरून तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कुटुंबीयांनी कोणत्याही घातपाताचा संशय व्यक्त केलेला नाही. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

Goa Land Zoning: गोव्यातील सेर्नाभाटी, कोलव्यातील 12.74 लाख चौ. मीटर जमीन 'अविकासयोग्य'; सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT