17 officer transfers; Sanjeev Gadkar as Special Home Secretary Dainik Gomantak
गोवा

17 अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजीव गडकर विशेष गृह सचिवपदी

मायकल डिसोझा यांची दक्षता संचालकपदी बदली झाली

दैनिक गोमन्तक

पणजी: दोन आयएएस अधिकारी व गोवा नागरी सेवेतील 15 अधिकाऱ्यांसह राज्य सरकारने 17 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. संजीव गडकर यांची विशेष गृह व कार्मिक सचिव म्हणून तर मायकल डिसोझा यांची दक्षता संचालकपदी बदली झाली आहे.

संजीव गडकर (आयएएस) यांना देण्यात आलेल्या पदभाराव्यतिरिक्त गोवा कर्मचारी निवड आयोगाचे सचिव म्हणूनही ताबा देण्यात आला आहे. तसेच मायकल डिसोझा यांच्याकडे जीपार्ड प्रशिक्षण संचालकपदाचा ताबा दिला आहे. शिवाय गोवा नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.

त्यामध्ये शशांक ठाकूर यांची डीआरडीए संचालकपदी, माया पेडणेकर दक्षता अतिरिक्त संचालक, कपिल फडते गोवा राज्य मनोरुग्ण आरोग्य अधिकारिणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अजय गावडे क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे संचालक, श्रीनेत कोठावळे दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी: 1, परेश फळदेसाई दक्षिण अतिरिक्त जिल्हाधिकारी: 2, जॉन्सन फर्नांडिस दक्षिण अतिरिक्त जिल्हाधिकारी: 3, केदार नाईक उत्तर अतिरिक्त जिल्हाधिकारी: 2, सुरेंद्र नाईक महसूल संयुक्त सचिव, प्रसाद वळवईकर एससी व ओबीसी वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मान्यूएल बार्रेटो दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी, विशाल कुंडईकर भूनोंदणी व वसाहत संचालक, प्रवीण बरड गोवा कोकणी अकादमी सचिव, विनान्सिओ फुर्तादो जीआयडीसी व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे. तसेच त्यांच्याकेड कारागृह महानिरीक्षकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT