Dengue Deaths in Goa Dainik Gomantak
गोवा

Dengue Deaths in Goa: राज्यात वर्षभरात डेंग्यूमुळे 17 मृत्यू? गोमेकॉत होणार डेथ ऑडिट

16 संशयित मृत्यूंचे या महिन्याअखेर ऑडिट; डॉ. कल्पना महात्मे यांची माहिती

Kavya Powar

Dengue Deaths in Goa: राज्यात पुन्हा एकदा डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी चिखली वास्कोमधील 6 वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने हा विषय आता परत डोके वर काढत आहे. माहितीनुसार, गोवा मेडिकल कॉलेजमध्ये या वर्षभरात डेंग्यूमुळे झालेल्या इतर 16 संशयित मृत्यूंचे या महिन्याअखेर ऑडिट करण्‍यात येईल, अशी माहिती आरोग्य खात्याच्या वेक्टर-बोर्न रोगनियंत्रण विभाग प्रमुख डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.

महात्मे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही पूर्वीच्या 16 प्रकरणांची छाननी जवळपास पूर्ण केली आहे. शिवाय 6 वर्षीय वाणी खानापूरची केस देखील डेथ ऑडिटसाठी ठेवत आहोत. यासाठी आम्ही आरोग्य पदाधिकारी आणि डॉक्टरांची समिती स्थापन केली आहे.

दुसरीकडे, मडगाव, राज्‍यात डेंग्‍यूची साथ नियंत्रणात येत असली तरी वास्‍को, कुठ्ठाळी आणि वेर्णा या तीन ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणावर कामगार वस्‍ती आहे, तिथेच डेंग्‍यूचे डास अजून सक्रिय असल्‍याचे दिसून आले आहे.

याचे महत्‍वाचे कारण म्‍हणजे, उघड्यावर साठवून ठेवलेले पाणी हेच असल्‍याचे उघड झाले आहे. हे पाणी साठवून ठेवण्‍यास आवश्‍‍यक असलेले उपाय न घेतल्‍यामुळेच पाऊस संपूनही या भागात डेंग्‍यू सक्रिय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT