Covid vaccines delivered to Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Vaccination: मुंबईहून कोविड लसीचे 17 बॉक्स राज्यात दाखल

राज्यात (Goa) काल पुन्हा एकदा कोविडबाबत(Covid-19) दिलासादायक बातमी मिळाला आहे. गेल्या चोवीस तासात एकाही कोरोनाबाधिताचे गोव्यात निधन झाले नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: आताच काही वेळापुर्वी गोवा विमानतळावर मुंबईहून कोविड लसीचे 17 बॉक्स आले आहे. आणि जलद कार्यवाही करत गोवा विमानतळ प्राधीकरणाने हे 17 बॉक्स राज्य सरकारकडे सुपूर्द केले आहे. राज्यात लसिकरणाला वेग आला असून 31 जुलैपर्यंत शंभर टक्के लोकांना अर्थात 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याचे ध्येय गोवा सरकारने ठेवले आहे. (17 boxes of Covid vaccines delivered to Goa from Mumbai)

राज्यात (Goa) काल पुन्हा एकदा कोविडबाबत(Covid-19) दिलासादायक बातमी मिळाला आहे. गेल्या चोवीस तासात एकाही कोरोनाबाधिताचे गोव्यात निधन झाले नाही. परवा म्हणजेच 12तारखेलाही असाच असाच प्रकार घडला होता. दरम्यान काल आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात तब्बल 5,651 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. जाहीर अहवालानुसार काल 227 नवे कोरोनाबाधित सापडले तर 171 कोरोना बाधीत बरे झाले. आज एकाही कोरोनाबाधितांचे निधन न झाल्याने कोरोनामुळे मरण आलेल्यांची संख्या 3,101 आहे. आजच्या दिवशी सक्रिय कोरोनाबाधीतांची संख्या 1,788 असून कोरोना बाधीत बरे होण्याची टक्केवारी 97.11 आहे. (Goa reports zero covid death in last 24 hours)

सुर्ल सत्तरी गावात 100 टक्के लसीकरण

राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 31 जुलैपर्यंत शंभर टक्के लोकांना अर्थात 18 वर्षावरील सर्वांना देण्याचे ध्येय गोवा सरकारने ठेवले आहे त्यानुसार सध्या दर दिवशी सुमारे 12 ते 14 हजार लसीकरण होत आहे. राज्यातील सूर्ल सत्तरी हे गाव १०० टक्के लसीचा पहिला डोस घेणारे पहिले गाव ठरले आहे . आज आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी ही घोषणा केली. पर्ये मतदारसंघात चोर्ला घाट माथ्यावर असलेल्या सुर्ल गावातील शंभर टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला. त्याबद्दल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सुर्लच्या नागरिकांचे अभिनंदन केले आहे .

दरम्यान जुलै महिन्याच्या 14 दिवसात तब्बल 2 लाख 8 हजार लोकांनी लस घेतली असून राज्यात आतापर्यंत 18 वर्षावरील 10 लाख लोकांनी पहिला डोस तर 1 लाख 80 हजार लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

SCROLL FOR NEXT