Goa Marathi Film Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Marathi Film Festival: 15 व्या गोवा चित्रपट महोत्सवाची 7 ऑगस्टपासून धूम; ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कृतज्ञता पुरस्कार जाहीर, 'बंडखोर' चित्रपटाने उघडणार पडदा

Goa Marathi Film Festival 2026: श्रीपाद शेट्ये, सचिन चाटे आणि सिद्धेश म्हांबरे उपस्थित होते. शेट्ये म्हणाले की, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोमंतकीय रसिकांना दर्जेदार मराठी चित्रपटांची साग्रसंगीत मेजवानी देणाऱ्या विन्सन वर्ल्डतर्फे आयोजित १५ वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव ७ ते ९ ऑगस्टदरम्यान पणजीतील आयनॉक्स आणि मॅकेनिज पॅलेस येथे होणार असून महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडणार असल्याची घोषणा विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये यांनी केली.

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी श्रीपाद शेट्ये, सचिन चाटे आणि सिद्धेश म्हांबरे उपस्थित होते. शेट्ये म्हणाले की, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

गोवा चित्रपट महोत्सवाचा उदघाटन सोहळा ७ ऑगस्ट रोजी होणार असून या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, सिनेअभिनेते संजय दत्त हेदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार अाहेत.

दर्जेदार सिनेमांची मेजवाणी; ऑनलाईन नोंदणीस लवकरच प्रारंभ

यंदाच्या महोत्सवात वर्ल्ड सिनेमा ड्रामॅटिक ग्रॅॅण्ड ज्युरी प्राईज पुरस्कार मिळविणारा ‘साबर बोंड’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्यासोबतच क्रांतिज्योती विद्यालय, उत्तर, फर्स्टक्लास दाभाडे, तिघी, तो ती आणि फुजी, तुंबाडची मंजुळा, मर्दिनी, भूतम भयम्, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासुबाई, घबाडकुंड हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यासोबतच पिशवी आणि स्नोफ्लॉवर या चित्रपटांचे प्रीमियर शो देखील होणार असून लवकरच ऑनलाईन नोंदणीला सुरूवात होणार असल्याचे सचिन चाटे यांनी सांगितले.

दिग्गज सिनेताऱ्यांशी संवादाची पर्वणी

यंदाच्या महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सचिन खेडेकर, रेणुका शहाणे, मृणाल कुलकर्णी, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, स्वप्नील जोशी, अनिता दाते, जितेंद्र जोशी, ललित प्रभाकर, निर्मिती सावंत, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, प्रार्थना बेहरे, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी आणि मृन्मयी गोडबोले यांच्यासह इतर कलाकार देखील उपस्थित राहणार असून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपस्थितांना मिळणार असल्याचे शेट्ये यांनी सांगितले.

‘बंडखोर’ घडला गोव्यात

यंदाच्या महोत्सवाची सुरुवात ज्या बंडखोर चित्रपटाने होतेय त्यांची निर्मिती व्हिन्सनने केली आहे. या चित्रपटाचे ९९ टक्के चित्रीकरण गोव्यात झाले आहे. यातील बहुतांश कलाकार आणि तंत्रज्ञ देखील गोव्यातीलच आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

SCROLL FOR NEXT