Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Baina: चोरांनी केली मारहाण, तरीही खिडकीतून पळाली! बायणा दरोड्यात 15 वर्षीय मुलीने वाचवले कुटुंबाचे प्राण; पुरस्कारासाठी शिफारस

Baina dacoity incident: दरोड्याच्या घटनेनंतर दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी पीडित नायक कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली

Akshata Chhatre

बायणा: बायणा येथील चामुंडी आर्केड इमारतीत मंगळवार (दि. १८) रोजी झालेल्या भीषण दरोड्याच्या घटनेनंतर दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी पीडित नायक कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. या भेटीनंतर त्यांनी गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला.

'शस्त्रधारी गुन्हेगार खुलेआम हल्ला करत आहेत'

कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी गोव्यात पसरलेल्या धोकादायक परिस्थितीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, हा काही पहिलाच दरोड्याचा प्रकार नाही. ते म्हणाले, "शस्त्रधारी गुन्हेगार उघडपणे लोकांचे दरवाजे तोडत आहेत, कुटुंबांवर हल्ला करत आहेत आणि समाजात भीती निर्माण करत आहेत.

बायणा येथील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे." एका आमदाराने स्वतःला 'गुंड' म्हणून मिरवल्यानंतरही सीआयडी काय करत आहे? नागरिकांचे संरक्षण करण्याऐवजी, सीआयडी राजकीय सर्वेक्षणांवर लक्ष केंद्रित करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

मुलीच्या शौर्यामुळे वाचले आई-वडील

कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दरोड्यादरम्यान नायक कुटुंबाने दाखवलेल्या धैर्याचे विशेष कौतुक केले. "आज सागर नायक आणि त्यांच्या पत्नीचा जीव वाचला, तो केवळ त्यांच्या शूर मुलीमुळे," असे ते म्हणाले.

दरोडेखोरांनी तिलाही मारहाण केली असताना, तिने स्वतःला सावरले. दरोड्याच्या वेळी तिने आपल्या पालकांना वाचवण्यासाठी दरोडेखोरांना तिची पिगी बँक देऊ केली. त्यानंतर संधी साधून ती खिडकीतून बाहेर पडली आणि शेजाऱ्यांना अलर्ट करून मदत मिळवली.

ती 'पुरस्कारासाठी' पात्र

कॅप्टन विरियातो फर्नांडिस म्हणाले की, या मुलीने दाखवलेल्या शौर्यासाठी ती 'बहादुरी पुरस्कारासाठी' पात्र आहे आणि यासाठी औपचारिक शिफारस करण्यात येईल. दरम्यान, या प्रकरणावर पुढील कार्यवाही काय करायची, याबद्दल काँग्रेस पक्षातर्फे चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात होणार 'WAVES फिल्म बाजार' चे उद्घाटन! 22 फीचर फिल्म; मराठी, कोकणी संस्कृतसह 18 हून अधिक भाषांतील कथा होणार सादर

Goa ZP Election: कवळे जिल्हा पंचायतवर मगोपचे वर्चस्व, काँग्रेसची भूमिका अस्पष्ट; एकतर्फी लढत होण्याची दाट शक्यता

'भारतामुळेच माझ्या आईचा जीव वाचला!' शेख हसीनांच्या मुलानं पंतप्रधान मोदींचे मानले आभार; बांगलादेश सरकारवर केले गंभीर आरोप

IFFI Country Focus: इफ्फी 'कंट्री फोकस'साठी जपानची निवड, कोणत्या खास फिल्म्स असणार; पहा..

International Mens Day: मुलाने विचारले 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा स्त्री दिनाप्रमाणे लोकप्रिय का नाही?’ तेंव्हा वडील म्हणाले.....

SCROLL FOR NEXT