पणजी: चौदाव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशीही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘स्थळ’ या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसून आली. शिवाय मराठी चित्रपट-दूरचित्रवाहिनींवरील मालिकांतील कलाकारांची उपस्थिती लक्षवेधक ठरली. या सिनेमहोत्सवाचा समारोप झाला. शेवटी दाखविण्यात आलेल्या ‘घात’ या सिनेमाला तर रसिकांची झुंबड उडाली होती.
विन्सन वर्ल्ड आणि गोवा मनोरंजन सोसायटीच्या सहकार्याने येथील आयनॉक्स परिसरात या गोवा राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचा दुसरा व अंतिम दिवस असल्याने मराठी चित्रपट कलाकारांची विशेष उपस्थिती दिसून आली.
याप्रसंगी गोव्यात आलेल्या कलाकारांशी गोमन्तक टीव्हीने खास संवाद साधला. त्या कलाकारांकडून महोत्सवाविषयी त्यांचे मनोगत जाणून घेतले.
या सिनेमहोत्सवात आपल्या तीन चित्रपटांचा समावेश आहे. जारण, सिनेमन अशा चर्चिल्या गेलेल्या चित्रपटांचा त्यात सहभाग आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला दरवर्षी आपण येतो. आता हा महोत्सव प्रतिष्ठेचा बनला आहे. शेट्ये बंधू चांगल्या पद्धतीने नियोजन करतात. माझा जन्म मुंबईत झाला तरी गोव्यात पुन्हा-पुन्हा यायला आवडते. येण्यासाठी निमित्त शोधत असतो.
हृषिकेश गुप्ते यांचा यावर्षी प्रदर्शित झालेला ‘जारण’ हा चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित झाला. त्यात माझी भूमिका आहे. गोव्यात चित्रपट महोत्सवाला आल्यानंतर छान वाटते. इफ्फीला आपण आले होते. येथे चित्रपटांसाठी आणि नाटकांसाठी येणे मोठी पर्वणी असते. गोव्यात दर्दी रसिक आहेत. यापूर्वी कला अकादमीत आपण व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांसाठी येऊन गेले आहे. येथे चित्रपट आणि नाटक पाहणारी संस्कृती असल्याचे दिसून येते.
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाचा मराठी महोत्सवात प्रीमियर झाला. सर्वांनी हा सिनेमा बघावा. मराठी चित्रपटाला चांगले दिवस नाहीत, अशी ओरड आहे. परंतु हा सिनेमा त्यास उत्तर आहे. अतिशय विनोदी विषयाने चित्रपट पुढे जातो. लेखक-दिग्दर्शकाला सांगायचे आहे, ते सांगितलेले आहेत. कोकणातील कलाकारांना घेऊन हा चित्रपट तयार केला गेला आहे. गोव्यात अतिशय दर्दी रसिक आहेत. ही कलाकारांची भूमी आहे. गाणे, नाटक येथे तयार झाले आहे. गोवा हे आपले जवळचे नाटक आहे.
मी पहिल्यांदाच या महोत्सवाला आले आहे. महोत्सवात ‘जित्राब’ हा आपला चित्रपट दाखविला गेला आहे. तो पाहिल्यानंतर रसिकांनी जी दाद दिली ती निश्चित खास आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून आपण पुढे आले. ‘जित्राब’ हा चित्रपट संवेदनशील आहे. अनेकांनी माझ्या कामाचे कौतुक केले. गोव्यात आल्यानंतर मी खूप खूप मजा करते.
या सिनेमहोत्सवात दर्जेदार चित्रपट आहेत. महोत्सवाचा जसा फायदा होतो, तसा अनेकदा बॉक्स ऑफिसवरही होत नाही. कारण विषय संवेदनशील असतात. मराठी सिनेमहोत्सवात चित्रपट दाखविल्यामुळे ते विषय रसिकांना समजतात व ते स्वीकारतात. त्यामुळे अनेक निर्माते-दिग्दर्शकांना असे चित्रपट करण्यास प्रोत्साहन मिळते. या सिनेमहोत्सवात आपला ‘जित्राब’ हा चित्रपट दाखविला जात असल्याने त्याचे औत्सुक्य असणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.