IFFI 2024 Dainik Gomantak
गोवा

IFFI 2024: गोवा विभागासाठी निवडले 14 चित्रपट! ‘गोवन डायरेक्टर्स कट’ नवीन विभाग; गोवारीकर आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष

Goa IFFI 2024: गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि बिगर वैशिष्ट्य श्रेणीत येथील चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या चित्रपटांचा समावेश केला आहे. त्यात दोन्ही विभागांमध्ये एकूण २५ प्रवेशिका आल्या होत्या, त्यापैकी १४ चित्रपट ज्युरी समितीने निवडले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

IFFI 2024 Goa Section Films

पणजी: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) गोवा मनोरंजन सोसायटीच्यावतीने (ईएसजी) गोवा विभागासाठी गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि बिगर वैशिष्ट्य श्रेणीत येथील चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या चित्रपटांचा समावेश केला आहे. त्यात दोन्ही विभागांमध्ये एकूण २५ प्रवेशिका आल्या होत्या, त्यापैकी १४ चित्रपट ज्युरी समितीने निवडले आहेत.

कमल स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली ज्युरी समितीचे सदस्य संजीव कुरूप व इतर भारतीय चित्रपट उद्योगातील व्यावसायिकांनी वरील चित्रपटांची निवड केली आहे. गोव्यातील निर्माते, दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘गोवन डायरेक्टर्स कट’ नावाचा एक नवीन विभाग सुरू केला आहे.

निवडलेले चित्रपट असे : निवडक दिग्दर्शक : खरवण (नित्या नावेलकर), हँगिग बाय ए थ्रेड (अक्षय पर्वतकर), गुंतता हृदय हे (साईनाथ उस्कईकर), माई (एस. शेट्ये). गोव्यातील निर्मात्यांचे चित्रपट : प्रारब्ध (जय आमोणकर दिग्दर्शित), कलखी वात (शिरीष राणे दिग्दर्शित), मेमरीज ऑफ द मँगीफेरा (हिमांशू सिंग दिग्दर्शित), आयज माका फाल्या तुका (श्रीजीत कर्णवार दिग्दर्शित), आदेयुस (नेहल चारी आणि आदित्य स्वरूप दिग्दर्शित), आसरो-श्रम धामची कथा (साईनाथ उस्कईकर दिग्दर्शित), ए सायलेंट बलिदान : गोवा लिबरेशनची अनटोल्ड स्टोरी (निखिल दीक्षित दिग्दर्शित), जीवन योगी : रवींद्र केळेकर (दिलीप बोरकर दिग्दर्शित), एक कप च्या! (किशोर अर्जुन दिग्दर्शित), फेमसली फाऊंड @१५! (सावियो डी नोरोन्हा दिग्दर्शित).

दरम्यान, गोवा राज्य चित्रपट महोत्सव सोसायटी मार्च २०२५ मध्ये गोवा राज्य चित्रपट महोत्सव २०२५च्या १०व्या, ११व्या आणि १२व्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे. हा महोत्सव द्विवार्षिक महोत्सव असेल, ज्यामध्ये गोवा राज्यात निर्मित वैशिष्ट्यपूर्ण आणि बिगर वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचा समावेश असेल. १०व्या आवृत्तीमध्ये १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत निर्मित, ११व्या आवृत्तीमध्ये १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत निर्मित, तर १२व्या आवृत्तीसाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत निर्मित झालेल्या चित्रपटांचा समावेश असेल.

आशुतोष गोवारीकर आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष

प्रख्यात चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांची यंदाच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदासाठी माझा विचार केल्याबद्दल मी महोत्सव संचालक शेखर कपूर, इफ्फी व एन.एफ.डी.सी.चे आभार मानू इच्छितो, असे गोवारीकर यांनी नमूद केले.

दरम्यान, अध्यक्षांना सिनेमाची सखोल समज असणे आवश्यक आहे आणि विविध दृष्टिकोन पाहण्यासदेखील सक्षम असणे आवश्यक आहे. आशुतोष यांच्या चित्रपटांनी कथा सांगण्याचे विस्तृत आणि वैविध्यपूर्ण स्वरूप यशस्वीरीत्या प्रदर्शित केले आहे, असे महोत्सव संचालक शेखर कपूर यांनी म्हटले आहे.

चित्रपट वित्त योजनेसाठी मागविले अर्ज

गोव्यातील चित्रपटांसाठी सुरू असलेल्या चित्रपट वित्त योजनेसाठी ‘ईएसजी’तर्फे अर्ज मागविले जाणार आहेत. जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२३ दरम्यान निर्मित चित्रपटांकडून ‘द गोवा स्कीम ऑफ फायनान्शियल असिस्टन्स फॉर फिल्म २०१६’ या योजनेंतर्गत अर्ज मागवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे, त्यानंतर या योजनेत सुधारणा केली जाणार आहे.

‘चित्रपट वित्त योजना-२०२६’अंतर्गत आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी अर्ज ईएसजी संकेतस्थळ www.esg.co.in वर ९ डिसेंबर २०२४ ते १८ जानेवारी २०२५ पर्यंत उपलब्ध असतील. अर्ज ईएसजी कार्यालयात २१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ या कार्यालयीन वेळेत आवश्यक संलग्नांसह सादर करावा, असे कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT