AAP TMC Goa Dainik Gomantak
गोवा

Goa : आप, टीएमसी विरोधात 'या' कारणामुळे 13 गुन्हे दाखल

निवडणुक काळातील प्रकारमुळे कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा विधानसभा निवडणुकीच्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी होर्डिंग्‍सबाजी केली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्‍यानंतर सर्व होर्डिंग्‍सवर कारवाई केली होती. दरम्यान, सरकारी व सार्वजनिक जागेचे विकृतीकरण केल्याप्रकरणी आप व टीएमसी पक्षाविरुध्द राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत 13 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा विधानसभा निवडणुकीच्यावेळी आप व टीएमसीने सरकारी व सार्वजनिक जागी आपल्या पक्षाचे चिन्हे पोस्ट केली होती. त्यामुळे सरकारी व सार्वजनिक जागेचे विकृतीकरण केल्याच्या आरोपाखाली आप व टीएमसी विरुध्द पोलीस ठाण्यांत 13 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पणजी, म्हापसा, कोलवाळ, पेडणे पोलीस ठाण्यांत आपवर 12 तर टीएमसीवर एका गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी राज्‍यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यानंतर निवडणूक आयोगाने सर्वप्रथम होर्डिंग्‍स लक्ष्‍य केले होते. रविवारपासून आयोगाने ही मोहीम व्‍यापक करताना तृणमूल काँग्रेस, आप, काँग्रेस पक्षाच्‍या होर्डिंग्‍सना अचूक हेरले व ते टराटरा फाडले होते. तर काही ठिकाणी त्‍या पक्षाच्‍या श्रेष्ठींच्‍या फोटोंना काळा व निळा रंग फासून ते लपविण्‍याचा प्रकार खुलेआम सुरू झाला होता. मात्र, या मोहिमेत भाजपच्‍या होर्डिंग्‍सना झुकते माप देण्यात आले होते, त्‍याबद्दल लोकांकडून आश्‍चर्य व्‍यक्त केले जात होते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT