पणजी: सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाला (Goa Murder Case) बारा दिवस पूर्ण झाले, ‘तरीही तपास चालू आहे’ असे मोघमपणे पोलिसांकडून (Goa Police) उत्तरे दिली जात आहेत. दुसरीकडे या प्रकरणाच्या विरोधात लोकांचा दबाव वाढत असून अनेक सामाजिक संस्था, महिला कार्यकर्त्या (Women activists) आता आक्रमक झाले आहेत.
कॅण्डल मार्च आणि मूक मोर्चाने पोलिस आणि सरकारला जाग येत नसेल, तर आक्रमक आंदोलन करावेच लागेल. त्यामुळेच येत्या आठवड्यात पोलिस मुख्यालयासमोर आंदोलनही करण्यात येणार आहे. दरम्यान, सिद्धी नाईक हिच्या वडिलांनी हरवळे येथे जाऊन अंत्यसंस्कारांचे सर्व क्रियाक्रम पूर्ण केले.
वडिलांच्या पोलिस स्थानकाला फेऱ्या
सिद्धीच्या मृत्यूला बारा दिवस झाले आहेत. तिचे वडील अजूनही कळंगुट पोलिस स्टेशनला फेऱ्या मारत आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलावले जाते मात्र त्यांना अद्यपि पंचनामा, शवचिकित्सा अहवाल दिला गेला नाही. याबाबत जनभावना अधिक तीव्र होत असून सामाजिक संस्था, महिला कार्यकर्त्या आक्रमक बनल्या आहेत. सरकार आणि पोलिसांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात ते आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.